स्वराज्य शिक्षक संघटनेचे 6 जून पासून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेसाठी बेमुदत उपोषण

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पार पडली असून टप्पा क्रमांक सहा मधील (अवघड क्षेत्र भरणे) शिक्षकांना दिनांक 7 जून 2023 पर्यंत कार्यमुक्त करू नये असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 4 मे 2023 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश काढले. या आदेशानुसार न्यायालयाने स्थगिती दिलेल्या याचिका कर्त्यांना वगळून इतर सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे आदेश निर्गमित केले आहे.

परंतु पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जोपर्यंत टप्पा क्रमांक 6 मधील शिक्षक अवघड क्षेत्रात रुजू होत नाहीत. तोपर्यंत अवघड क्षेत्रातून सोप्या क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नाही असा अन्यायकारक आदेश दिनांक 17 मे रोजी काढला आहे. याबाबत स्वराज्य शिक्षक संघटनेने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याना निवेदन देऊन त्यांचे 17 मे चे आदेश रद्द करण्याची विनंती दिनांक 18 मे रोजी निवेदन देऊन केली होती. बदली झालेले शिक्षक कार्यमुक्त करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद कडुन पर्यायी व्यवस्था केली असली तरी कार्यमुक्ती आदेश मिळत नाहीत.

राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे कार्यमुक्तीची कार्यवाही झाली नसल्या मुळे 6 जून 2023 पासून पुणे जिल्हा परिषद समोर महिला शिक्षिका या शिक्षकांसह उपोषणास बसणार असल्याची माहिती स्वराज्य रक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष गजानन पांचाळ यांनी दिली. याबाबत बबन सातव,अनिल वाडेकर, सुनील निचीत, संजय वाळके, हनुमंत चव्हाण, वंदना पाचर्णे, रेणुका कोरे, मनिषा दरेकर, दत्तात्रय गोरे, श्रीकांत सर, शिवाजी शिरसाट, विजय कारखेले, दत्तात्रय आढाव, अरविंद शिंदे, विजय गोसावी, ज्ञानेश्वर कुंभार, विलास पुंडे,यांनी निवेदन दिले आहे.