दहिवडी गावची पाणीदार गाव म्हणून ओळख नावारुपाला

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): दहिवडी (ता. शिरुर) येथे यापूर्वी बांधलेले बंधारे व मागील वर्षी केलेले खोलीकरण त्यामुळे सध्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे आवर्तन वेळेत आल्याने दहिवडीतील बंधारे फुल झाल्याने शेतकरी समाधानी झालेले असून आता दहिवडी गावची ओळख पाणीदार गाव म्हणून नावारुपाला येत असल्याचे उपसरपंच सचिन गारगोटे यांनी दिली.

दहिवडी (ता. शिरुर) हा कायम दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेले गाव कित्येक वेळा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना पाण्यामुळे पिके सोडून देण्याची वेळ आलेली आहे. मात्र यापूर्वी सदर ठिकाणी बंधारे बांधून ठेवलेले होते. त्यामध्ये पाणी साठा कमी राहत असताना मागील वर्षी नुकतेच सर्व बंधारे व ओढ्यांचे खोलीकरण करुन घेण्यात आले असताना सध्या चासकमान कालव्याचे पाणी बंधाऱ्यात आल्याने बंधारे फुल भरलेले असल्यामुळे गावचा पाणी प्रश्न किमान दोन महिने तरी सुटला असताना सध्या परिसरातील गहू, कांदा, हरभरा, कोबी व उसाच्या उत्पादनात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. तसेच ओढ्याचे खोलीकरण झाल्याने या भागातील विहिरींसह विंधन विहिरींची सुद्धा पाणी पातळी वाढली आहे, सध्या ओढे व बंधारे फुल भरल्याने ग्रामस्थांच्या वतीने पाण्याचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी उपसरपंच सचिन गारगोटे, माजी सरपंच आनंदराव गारगोटे, सरपंच संतोष दौंडकर, माजी उपसरपंच राजेंद्र ढमढेरे, राजेंद्र जाधव, किसनराव दौंडकर, माजी चेअरमन मच्छिंद्र गारगोटे, केशव गारगोटे, अविनाश मांजरे, धनंजय गायकवाड, सागर गारगोटे, अविनाश गारगोटे, विकास गारगोटे, राहुल लवांडे, गौरव गारगोटे, अविनाश गायकवाड, अक्षय गारगोटे, रमेश गारगोटे, गणपत गारगोटे, देविदास गारगोटे, कैलास गायकवाड, राहुल गारगोटे, बबन गारगोटे, ऋषिकेश गारगोटे आदी मान्यवर उपस्थित होते. पाणी प्रश्न मिटत असल्याने दहिवडी गावची आता पाणीदार गाव म्हणून ओळख निर्माण होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे.