टाकळी भीमात पिंजऱ्यात अडकलेल्या उद मांजरांची सुटका

शिरूर तालुका

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कामगिरी

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथे पिंजऱ्यात अडकलेल्या दोन उद मांजरांची सुटका करुन त्यांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्तकरुन जीवदान देण्यात करण्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.

टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथे अतिष गायकवाड यांच्या घराबाहेर असलेल्या माशांच्या पिंजऱ्यामध्ये दोन भलेमोठे उद मांजर अडकल्याचे दिसून आले, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळताच प्राणीमित्र शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता 2 उदमांजर पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले.

दरम्यान प्राणीमित्रांनी दोन्ही उदमांजरांना पिंजऱ्यातून शिताफीने बाहेर काढून शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक प्रमोद पाटील, अभिजित सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उदमांजरांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले, यावेळी आकाश भोरडे, अतिष गायकवाड, रवी वाव्हळ यांसह आदी उपस्थित होते, तर कोठेही जखमी पशु पक्षी आढळून आल्यास नागरिकांनी वनविभाग तसेच प्राणीमित्रांना संपर्क करण्याचे आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले आहे.