शिरुर तालुक्यात अहिल्याबाईंच्या स्मारकासाठी जागा द्या

शिरूर तालुका

अहिल्या विकास प्रतिष्ठानची शिरुर नगर परिषदेकडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक बनवण्यासाठी सरकारी मालकीची असलेली राखीव जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष व अहिल्या विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे यांनी शिरुर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिरुर तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून धनगर समाजाचे प्रेरणास्थान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहेत. मात्र शिरुर तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक होणे गरजेचे असताना धनगर समाजाचे नेते व कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

तसेच शिरुर तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक झाल्यास त्याची जबाबदारी घेण्यास देखील धनगर बांधव तयार असल्याने शिरुर तालुक्यात सदर स्मारकासाठी जागा उपलब्ध होणे गरजेचे असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरुर तालुकाध्यक्ष व अहिल्या विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे यांनी शिरुर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी सरकारी मालकीची राखीव जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.