सविंदणे -कवठे येमाई रस्त्यालगत धोकादायक विहीर

शिरूर तालुका

सार्वजनिक बांधकाम विभागाचे जामणीवपुर्वक दुर्लक्ष

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे – कवठे या रस्त्यावर पांदी परीसरात रस्त्याच्याच कडेला एक धोकादायक विहीर आहे. या विहिरीचे बांधकाम केलेले नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला कठडे बांधले नसल्याने मोठा अपघात होऊन जीवीतहानी होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे.

कवठे येमाईवरून सविंदण्याला जवळपास दोनशे विदयार्थी शिक्षण घेण्यासाठी ये -जा करत आहे. तसेच सविंदण्यावरून कवठे येमाईला बँकेच्या कामकाजासाठी व शिरूरला इतर, शासकीय कामकाजासाठी नागरीकांना सारखी ये -जा करावी लागते. त्यामुळे या रस्त्यावर सारखी वर्दळ असते. रस्ता रुंदीला कमी असल्यामुळे मोठ्या वाहनांच्या पुढे टुव्हीलर ओव्हरटेक करता येत नाही. त्यातच या रस्त्याच्या लगतच ही कठडे नसणारी धोकादायक विहीर असल्याने मोठा धोका संभावत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत कठडे बांधून घेण्याची मागणी सातत्याने होत आहे. भविष्यात सदर ठिकाणी अपघात होऊन जीवीतहानी झाल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल असे भाजपाचे सरचिटनिस बाळासाहेब लंघे यांनी म्हटले आहे.