कासारीच्या शाळेचा विकास करा अन्यथा…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करत शाळेची सुधारणा करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे वारंवार करुन देखील शाळेची सुधारणा होत नसल्याने शाळेची सुधारणा करा अन्यथा 1 ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी दिला आहे.

कासारी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नादुरुस्त झालेली असल्याने यापूर्वी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार विनंती करत लेखी पत्राद्वारे शाळेला चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून संगणक संच देणे, शाळेच्या इमारतीच्या दरवाजा व खिडक्या दुसदुरुस्त करणे, अंगणवाडी छत दुरुस्त करणे, शाळेसाठी पाण्याची टाकी उपलब्ध करणे, किचन शेड दुरुस्त करणे यांसह आदी कामांची शाळेसाठी मागणी करण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायत प्रशासन फक्त आश्वासन देत असून कोणतीही ठोस कार्यवाही करत नाही, तसेच याबाबत ग्रामसभेत चर्चा होऊन देखील ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने सदर कामांच्या अंमलबजावणी न केल्यास एक ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी दिला आहे.

कामांबाबत प्रक्रिया झालेली असून लवकर कामे होतील; वसंत पवार

कासारी शाळेच्या कामासाठी नवनाथ भुजबळ यांनी केलेल्या मागण्यांबाबत प्रक्रिया झालेल्या असून दहा ते पंधरा दिवसात कामांना सुरुवात केली जाईल, असे कासारी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी वसंत पवार यांनी सांगितले.