सरपंचांनी सोडवला पन्नास वर्षाचा स्मशानभूमीचा प्रश्न

मुख्य बातम्या

बुरुंजवाडीत सरपंच नानासाहेब रुके व डॉ. रवींद्र टेमगिरेंकडून जागा

शिक्रापूर (शेरखान शेख): बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांना 50 वर्षापासून नागरिकांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक असलेली स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना सरपंच नानासाहेब रुके, मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे या चौघांनी 20 गुंठे जमीन विकत घेत ग्रामपंचायतला स्मशानभूमीसाठी देऊ केली असल्याने गावातील 50 वर्षापासून प्रलंबित स्मशानभूमीचा प्रश्न आता संपणार आहे.

बुरुंजवाडी (ता. शिरुर) गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन होऊन सत्तेचाळीस वर्षे झाले असून ग्रामपंचायत स्थापनेच्या पूर्वीपासून गावाला नागरिकांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक स्मशानभूमी उपलब्ध नव्हती तर स्मशानभूमी बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने यापूर्वी गावाला स्मशानभूमीसाठी जागा दान करण्याचा शब्द सरपंच नानासाहेब रुकेव डॉ. रवींद्र टेमगिरे यांनी दिला असता नुकतेच सरपंच नानासाहेब रुके, किसान संघाचे अध्यक्ष मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे डॉ. रवींद्र टेमगिरे, चेअरमन विजय टेमगिरे यांनी वीस गुंठे जागा विकत घेऊन ग्रामपंचायतला बक्षीस पत्र देऊ केली आहे.

सरपंच नानासाहेब रुके यांनी जनसेवा योजनेच्या माध्यमातून नवीन स्मशानभूमी बांधकामसाठी 1 लाख निधी मंजूर करुन घेतल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे तर गावातील इतर विकासकामे देखील जलद गतीने मार्गी लावणार असल्याचे संरपच नानासाहेब रुके, उपसरपंच अश्विनी नळकांडे, चेअरमन विजय टेमगिरे, माजी सरपंच विलास नळकांडे, सुशिलकुमार रुके, धनंजय रुके, शरद टेमगिरे, ग्रामपंचायत सदस्या कावेरी नळकांडे, पूनम रुके यांनी सांगितले. तर गावातील पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानभूमीचा प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांसह ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले आहे.