शिक्रापुरात मुलीला जन्म देणाऱ्या दांपत्यांचा सन्मान

शिरूर तालुका

माऊलीनाथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा अनोखा व आदर्श उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): अलीकडील काळामध्ये मुलींचा जन्म झाल्यानंतर अनेक ठिकाणी मुलींचा तिरस्कार करण्याच्या घटना घडत असताना शिक्रापूर येथील माऊलीनाथ हॉस्पिटलच्या वतीने मुलींना जन्म देणाऱ्या दाम्पत्यांसह मुलींचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान करुन मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात येत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील माऊलीनाथ मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून नेहमीच समाजापयोगी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून नव्याने मुलींना जन्म देणाऱ्या दाम्पत्यांसह मुलींचा सन्मान करण्याचा उपक्रम माऊलीनाथ हॉस्पिटलचे संचालक राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे, पुणे जिल्हा सरचिटणीस डॉ. अजिंक्य तापकीर, यांनी सुरु केला आहे. नुकतेच मुलीला जन्म देणाऱ्या दांपत्याचा उद्योजक हरिष येवले यांच्या हस्ते मुलीसह दांपत्यास पोशाख भेट देत पेढे भरवून स्वागत करण्यात आले.

यावेळी उद्योजक हरिष येवले, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे, पुणे जिल्हा सरचिटणीस डॉ. अजिंक्य तापकीर, डॉ. मंजिरी सोनवणे, डॉ. सायली तापकीर, डॉ.सचिन सपकाळ, अमर गर्जे यांसह आदी उपस्थित होते, तर याबाबत बोलताना माऊलीनाथ हॉस्पिटलच्या वतीने सुरु करण्यात आलेला उपक्रम समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे मत उद्योजक हरिष येवले यांनी व्यक्त केले.