यश अपयशाचा विचार न करता प्रयत्न करा; हेमंत शेडगे

शिरूर तालुका

केंदूरला रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला यश व अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र विद्यार्थ्यांनी यश अपयशाचा विचार न करता अविरत प्रयत्न करावे त्यामुळे यश नक्कीच मिळते, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा शासकिय रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून सदर परीक्षेत अनुष्का साकोरे व कुमारी अंकिता ताठे यांनी अ श्रेणी तर आदिती दोंड, अनुष्का गावडे, मोहिनी गावडे, प्रियंका लिमगुडे, प्रज्वल पऱ्हाड, अविष्कार साकोरे, रविराज शिंदे, शिवराज शिंदे, श्रावणी सुक्रे, गायत्री थिटे, मयुरी थिटे यांनी ब श्रेणी मिळवून यश संपादित केले असून सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संजय जोहरे यांनी मार्गदर्शन केले असल्याने यशस्वी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक संजय जोहरे यांचा पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्य अनिल साकोरे, चंद्रकांत थिटे, पुणे विभागीय सदस्य सदाशिव थिटे, रामशेठ साकोरे, संगिता साकोरे, सरपंच सूर्यकांत थिटे, उपसरपंच विठ्ठलराव ताथवडे, शालेय समितीचे अध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, शाहुराज थिटे यांसह आदी उपस्थित होते, तर यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्या विद्यार्थ्यांकडून सोशल मिडीयाचा अतिरेक होत असून सोशल मिडीयाचा जपून वापर करावा तसेच त्याचे दुष्परिणाम समजून घ्यावे असे देखील हेमंत शेडगे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत थिटे यांनी केले तर प्राचार्य अनिल साकोरे यांनी आभार मानले.