शिरूर तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनद्वारे फवारणी

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील प्रगतशील शेतकरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ यांनी आपल्या शेतात अभिनव प्रयोग करत शेतातील झेंडू व ऊसाच्या व्ही.एस.आय. १८१२१ या नवीन प्रजातीचे ऊस या पीकाला आधुनिक तंत्रज्ञानातील ड्रोनद्वारे फवारणी केली आहे.

बाळासाहेब पडवळ हे आपल्या शेतात कायमच नवनवीन प्रयोग यशस्वी करतात. त्यांनी ऊस व इतर पिकांना खत म्हणून सुक्ष्म मूलद्रव्ये पाण्यातुन मुळांना तसेच पानांना सुद्धा वरुन फवारणी महत्त्वाची असते. व्ही.एस.आय. चे वसंत उर्जा तसेच मल्टीमायक्रोन्युटिन्ट तसेच इतर कीटकनाशक ची फवारणी त्यांनी पिकांना टॉनिक म्हणुण ड्रोनद्वारे केली आहे.

हातपंपाद्वारे फवारणी करताना औषधे अंगावर उडतात त्याचा परीणाम शेतकऱ्यांचा आरोग्यावर होतो. त्यामुळे आरोग्यासाठी फलदायी व वेळेची बचत म्हणून ड्रोनद्वारे फवारणी करणे महत्त्वाचे आहे. साधारण ड्रोन फवारणीसाठी एकरी ८०० रुपये खर्च येतो. १५ मिनिटांत एक एकर फवारणी केली जाते. वसंतदादा शुगर इन्सिट्यूट कृषी विभाग मांजरी येथील आधिकारी तसेच भिमाशंकर मुख्य शेतकी आधिकारी दिलीप कुरकुटे व त्यांचा स्टाफने शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणी करण्याकामी प्रोत्साहीत केले आहे.

ड्रोनद्वारे फवारणी केल्यास वेळेची, पैश्याची बचत होते. तसेच ऊस वाढ झाल्यास ऊस पिकांना अँसोटोबॅक्टर फवारणी करणे आवश्यक असते.परंतू उस वाढल्यानंतर हातपंपाने ऊसाची फवारणी करता येत नाही. तसेच जमिनीतून ऊस पिकाला योग्य मुलद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी केल्यास ऊसाच्या पांनामधून मुलद्रवे चांगल्या प्रकारे मिळाल्याने ऊसाची वाढ जोमाने होण्यास मदत होते.