शिरुर शहरात ऐन दिवाळीच्या सणाला पुन्हा गोरगरीबांच्या दुकानावर वरवंटा फिरवणार?

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये काही वर्षापूर्वी पाबळ फाटा ते पोस्ट ऑफिस (शिवसेवा, नगरपालिका मधील गाळे सोडून) पर्यंत गोरगरीब जनतेच्या टपऱ्या व काही लोकांची घरे तोडून रस्ता रुंदीकरण करण्यात आले होते.

गरीब लोक भरमसाठ डिपॉझिट व अनाठाई भाडे देऊ शकत नसल्याने, रोडच्या शेजारी हातगाडी लावून काही तरी उद्योगधंदा करुन आपल्या मुलाबाळांची खळगी भरत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला नगरपालिका एका वृत्तपत्रात सूचना प्रसिद्ध करत, प्रजिमा 92 मधील अतिक्रमणाबाबत सूचना करुन अतिक्रमण काढण्याबाबत जाहीर केले आहे.

वास्तविकता प्रतिमा 92 ची लांबी 4.3 कि.मी .ची असून शिरूर नगरपरिषदेने संपूर्ण रस्त्यावरील अतिक्रमाने न काढता पुणे नगर बायपास ते बस स्थानकापर्यंतच्या अतिक्रमणे काढण्याबाबतची सूचना केलेली आहे .हा प्रकार विसंगत आहे व शासनाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण करणारा आहे. हे लक्षात येताच रवी लेंडे अध्यक्ष जनहित कक्ष, अनिल बांडे अध्यक्ष शिरुर प्रवाशी संघ, महिबुब सय्यद उपाध्यक्ष मनसे पुणे जिल्हा यांनी तहसिल कार्यालय शिरुर, पोलीस निरीक्षक शिरुर पोलीस स्टेशन, मुख्याधिकारी शिरुर नगरपरिषद व जिल्हा अधिकारी कार्यालया पुणे यांना निवेदन देत शासनाने कारवाई करत असताना प्रजिमा-92 मधील सर्व अतिक्रमणांवर कारवाई केली पाहिजे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

प्रजिमा- 92 ची लांबी 4.3 की मी असताना अर्ध्या रस्त्यावरील अतिक्रमणांचे सूचना काढणे म्हणजे गावातील धन दांड्याचे दुकाने व सत्ताधाऱ्यांच्या संस्था यांनी केलेल्या अतिक्रमणे वाचण्यासाठी गोरगरिबांच्या दुकानावर वरवंटा फिरवून प्रशासन काय साध्य करणार आहे व शिरुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गावातील सत्ताधाऱ्यांची व धन दांगड्यांचे दुकान दुकाने वाचवण्याचा प्रयत्न करुन शहरातील गोरगरिबांवर अन्याय करत आहे. अतिक्रमणे काढायचे असतील तर सरसकट काढावी असे मत पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी व्यक्त केले.

काही वर्षापुर्वी शिरूर शहरात बसस्थानक रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने काढून अतिक्रमण हटवले होते. शेकडो तरुण, परीवार यामुळे आपला रोजगार हिरावून बसले होते. त्यांचे पुनर्वसन करण्यात अद्याप यश आले नाही.आता पुन्हा अशी दुकाने हटवल्यास अनेक संसार उघडयावर येणार आहेत.