शिरुर तालुक्यात कुणबी सर्वेक्षणाच्या कामामुळे मास्तर बेजार, विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात शासनाने कुणबी सर्वेक्षणाचे काम प्राथमिक शिक्षकांना दिल्याने विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही. त्यामुळे रामलिंग महिला उन्नती बहु उद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत शिरुर तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम लावण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांचा काळ असुन शिक्षक हे सर्वेक्षण करण्यात गुंतलेले आहे. याबाबत अनेक पालकांनी संस्थेशी, सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधत विद्यार्थ्यांशी होणाऱ्या शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. हे सर्व पाहता शिक्षक हे विद्यार्थांना घडवण्यासाठी आहे की सर्वेक्षण मतदानाचे काम करण्यासाठी आहेत असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

 

तसेच समाजात अनेक सुशीक्षीत बेरोजगार समाजात आहेत. अनेक सामाजिक संस्था आहेत अशी कामे त्यांना दिल. तर सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार मिळेल आणि विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्वेक्षणासारखी कामे इतर यंत्रणेला देऊन सहकार्य करावे. असे लेखी निवेदन शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, अखिल भारतीय मराठा महासंघ प्रदेश सरचिटणीस शोभना पाचंगे, राष्ट्रवादी युवती तालुका अध्यक्ष संगीता शेवाळे यांनी दिले आहे.