शिरुर; भष्ट्राचार प्रकरणी कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी प्रियांका जगताप यांचा आत्मदहनाचा इशारा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या भष्ट्राचार प्रकरणी ग्रामपंचायत सदस्या प्रियांका जगताप यांनी वेळोवेळी लेखी पुराव्यासहीत प्रशासनाकडे आवाज उठवला आहे. परंतु प्रशासनाने त्याची अदयाप दखल न घेतल्याने 26 जानेवारी 2024 रोजी शिरुर येथील पंचायत समितीच्या कार्यालयात समोर त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत जगताप यांनी शिरुर येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की ढोकसांगवी (ता.शिरुर) गावाचे तत्कालीन सरपंच मल्हारी फक्कड मलगुंडे व स्वाती मल्हारी मलगुंडे यांनी दि. २४ नोव्हेंबर २०११ ते २० फेब्रुवारी २०१४ या कालावधीमध्ये विविध विकास कामांमध्ये तत्कालीन ग्रामसेवक व ठेकेदार या सर्वांशी संगनमत करुन ग्रामपंचायतीच्या विकासकामाच्या निधीतून मोठ्या प्रमाणात अफरातफर केलेली आहे.

 

या अफरातफरीबाबत व अहवालाबाबत शिरुर पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद पुणे येथे प्रियांका जगताप यांनी लेखी तक्रार केली होती. तसेच याबाबत उपोषण ही केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमून कागदपत्रांची तपासणी केली असता सदर समितीने अहवालात गैरव्यवहार झाल्याचे सांगितले आहे.

 

त्यानुसार तत्कालीन ग्रामसेवक चितळकर एल. एस यांनी सचिव पदाच्या कर्तव्यात कसूर केली आहे. मनमानी कारभार केला आहे तरी त्या कार्यवाहीस पात्र असून त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६७ मधील (३) नुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६४ त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून प्रशासकीय कार्यवाही करून मोठी शास्ती करण्यात यावी. तसेच शासन परिपत्रक दि. १८ सप्टेंबर २०१९ अन्वये ग्रामपंचायत अधिनियमानुसार गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली होती.

 

तरीही अद्याप गटविकास अधिकारी गुन्हे दाखल करत नसल्याने २६ जानेवारी २०२४ रोजी शिरुर पंचायत समिती समोर त्या आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी शिरुर येथे पत्रकार परीषदेत सांगितले.