शिरुरमध्ये महाराजस्व अभियानात तब्बल ४४५ नोदींचे निर्गतीकरण

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई यांनी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी महाराजस्व अभियान राबविणेचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने ई-फेरफार प्रणालीमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत साध्या नोंदी १ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आणि विवादग्रस्त नोंदी ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाहीत. याकरीता तहसिल व मंडळ स्तरावर फेरफार अदालत आयोजित करणेबाबत शासन निर्णयाद्वारे निर्देश देण्यात आलेले होते.

त्या अनुषंगाने तहसिल कार्यालय शिरुर यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बुधवार, (दि. १२) एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये मंडलनिहाय नोंदी निर्गत करुन शिबिराचे ठिकाणी नागरीकांना ७/१२, ८-अ व फेरफार उतारे वितरीत करुन प्रत्यक्ष लाभ देण्यात आलेला असल्याची माहीती पुणे उपविभागीय आधिकारी स्नेहा किसवे -देवकाते यांनी दिली आहे.

मंडलभागनिहाय निर्गती केलेली माहीती खालीलप्रमाणे

१) शिरूर मंडलभागात दि. ११ एप्रिल पर्यंत प्रलंबित नोंदी ४७ इतक्या होत्या. (दि. १२) एप्रिल रोजी १८ नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

२) पाबळ मंडलभागात प्रलंबित नोंदी ११५इतक्या होत्या.७० नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

३) रांजणगाव गणपती मंडलभागात प्रलंबित नोंदी ८२ इतक्या होत्या. ५७ नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

४ )मलठण मंडलभागात प्रलंबित नोंदी ४९ इतक्या होत्या. ३४नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

५) तळेगाव ढमढेरे मंडलभागात प्रलंबित नोंदी ४७ इतक्या होत्या. १८ नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

६) कोरेगाव भिमा मंडलभागात प्रलंबित नोंदी ६५ इतक्या होत्या.४७ नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

७) वडगाव रासाई मंडलभागात प्रलंबित नोंदी १४४इतक्या होत्या. ६३ नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

८) शिरूर मंडलभागात प्रलंबित नोंदी ९३ इतक्या होत्या. ६९ नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

वरीलप्रमाणे दि. ११ एप्रिल रोजी प्रलंबित असलेल्या ७९७ फेरफार नोंदीपैकी दि. १२ एप्रिल रोजी ४४५ फेरफार नोंदी निर्गत करुन त्याचे प्रत्यक्ष लाभ नागरीकांना देण्यात आलेला आहे. अदालत कार्यक्रमास नागरीकांनी भरघोस प्रतिसाद देवून व प्रशासनाचा पारदर्शक कार्यक्रम पाहून समाधान व्यक्त केले . तसेच महसूल प्रशासनाने शिरुर तालुक्यामध्ये फेरफार अदालत कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन करुन त्याच दिवशी ७/१२ व फेरफार वितरण केल्यामुळे नागरीकांमध्ये शासनाप्रती जिव्हाळयाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. सदर फेरफार अदालत कार्यक्रमाचे अनुषंगाने सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांनी चांगले नियोजन करुन प्रलंबित फेरफार नोंदी निर्गती केल्या आहे.

पुणे उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे -देवकाते, व शिरूर तहसिलदार

बालाजी सोमवंशी हे शिरुर तहसिल कार्यालयामधील फेरफार अदालत कार्यक्रमास उपस्थित राहिले असून त्यांनी तालुकांतर्गत सर्व कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेतला आहे. तसेच स्नेहा किसवे देवकाते, उपविभागीय अधिकारी पुणे यांनी यापुढेही अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन लोकाभिमुख पारदर्शक प्रशासकीय कामकाज करणार असल्याचे सांगितले आहे.