दुष्काळी कान्हूर मेसाईच्या अभ्यासिकेतून यशाची गुढी

शिरूर तालुका

कान्हूर मेसाईच्या सहा जणांची पोलीस दलात गगन भरारी

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) हे शिरूर तालुक्यातील दुष्काळी गाव असून आजूबाजूच्या सर्व वाड्या पाण्यापासून वंचित अस्याना या गावातील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्राचार्य अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या अभ्यासिकेत अभ्यास करुन विद्यालयातील सहा जननी नुकताच पोलीस भरतीत पयश संपादित करुन दुष्काळी गावातून इतिहास घडवला आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) गावासह आजूबाजूच्या सर्व वाड्या वस्त्या पाण्यापासून वंचित शेती हे एकमेव साधन त्यामुळे अनेकांना शिक्षणापासून अलिप्त रहावे लागत असल्याने विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्राचार्य अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत व विद्या विकास मंडळाच्या माध्यमातून पस्तीस आसनव्यवस्था असलेली अभ्यासिका विद्यालयात सुरु झाली.

सदर ठिकाणी कोणतेही शुल्क नसल्याने विद्यार्थी जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करु लागली, येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अशोक मिडगुले – पुणे लोहमार्ग पोलीस, अमोल मिडगुले – पुणे शहर पोलीस, संकेत ढगे – पिंपरी चिंचवड पोलीस, विशाल धुमाळ – ठाणे शहर पोलीस, माळसा खर्डे – पिंपरी चिंचवड पोलीस, गौरव तागड – मीरा भाइंदर पोलीस अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी पोलीस दलात गगन भरारी घेत गावचे नाव उज्वल केले असून एकाच वेळी दुष्काळी गावातील सहा जणांची पोलीस दलात भरती झाली आहे.

विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या धामारी, चिंचोली मोराची, मिडगुलवाडी, वरुडे, लाखेवाडी, मांदळवाडी या भागातील युवकांनी जिद्द बांधली असताना नुकतेच जाहीर झालेल्या पहिल्याच यादीत अशोक नाथा मिडगुले ह्या युवकाने यशाचा झेंडा फडकविला. त्याचे पाठोपाठ अमोल मिडगुले, संकेत ढगे, विशाल धुमाळ, माळसा खर्डे, गौरव तागड यांनी यश खेचून आणले आहे. त्यांच्या यशा बाबत बोलताना आम्हाला अभ्यासासाठी योग्य जागा असताना कान्हूरच्या विद्यालयाने सुरू केलेल्या अभ्यासिकेत आम्ही गेलो त्यामुळे आमचा आत्मविश्वास निर्माण झाला. अभ्यास करुन परीक्षा दिली त्यातून अवघड वाटणारी गोष्ट साध्य झाली याचा खूप आनंद होत असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

अजूनही विद्यार्थी यशस्वी होतील; अनिल शिंदे (प्राचार्य)

कान्हूर मेसाईच्या विद्यालयात आम्ही विद्यार्थ्यांना संधी दिली त्यांचे त्यांनी सोने केले असून अद्याप मुंबईची परीक्षा बाकी असल्याने आमच्या अभ्यासिकेतील अजूनही किमान दहा मुळे यशस्वी होतील अशा आमचा आत्मविश्वास असल्याचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले.