विकासकामे मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर पवन वाळूंज यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): १५ व्या वित्त आयोगातून मंजूर असलेली सन २०२० ते २०२२ या काळातील विकासकामे अद्यापही मार्गी लागत नसल्याने आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फाकटे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य पवन वाळूंज यांनी दिला होता. सन २०२० ते २०२२ या कार्यकाळात फाकटे ग्रामपंचायतमध्ये अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली होती. मात्र मंजूर विकासकामे वारंवार तक्रार करूनही पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वाळूंज यांनी सांगितले.

यावेळी मंजूर विकासकामे आपण एक महिन्यात मार्गी लावणार आहे अशी लेखी स्वरूपातील माहिती ग्रामपंचायतसह सरपंच रेखा दरेकर, उपसरपंच रामदास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या सिमा केदारी ग्रामसेवक स्वप्नील कवडे यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण मंगळवार (दि. २५) रोजी बसणार असलेल्या उपोषणाला तात्पुरती स्थगिती देत असल्याचे पवन वाळूंज यांनी सांगितले.

गेली 2 वर्षे मंजूर विकासकामांतील काही कामे चालू कार्यकारिणीच्या काळात मार्गी लागलेली आहेत. मात्र रखडलेल्या कामांपैकी सार्वजनिक ठिकाणी पाणी संकलन, हातपंप दुरूस्ती, भिल्ल वस्ती पाणि टाकी बांधणे, नाना नानि पार्क तयार करणे, सावर्जनिक ठिकाणी मुतारी बांधणे, निर्जतूकीकरण करणे, आरोग्य उपकेंद्र फर्निचर खरेदी, शाळा साहित्य, पाणी पुरवठा देखभाल दुरूस्ती, अंगणवाडी तार कंपाऊड, मागासवर्गीय वस्तीवर पाणी पुरवठा इत्यादी कामे झाली नसून उन्हाळ्याच्या दृष्टीने पाण्याच्या प्रश्नासंदर्भातील कामांसह इतर कामे झाली नसल्याने आपण या उपोषणाला बसणार होतो.

मात्र दिलेल्या आश्वासनाचा विचार करून सदरच्या उपोषणाला तात्पुरती स्थगिती देत असून येणाऱ्या काळात जर मंजूर विकासकामे मार्गी लागली नाही तर लोकशाहीच्या मार्गाने आपण पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे वाळूंज यांनी यावेळी सांगितले.

[मंजूर झालेली विकासकामे आम्ही एक महिन्यात पूर्ण करणार असल्याचे लेखी निवेदन ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या वतीने आम्ही पवन वाळूंज यांना सोमवार (दि. २४) रोजी लेखी स्वरुपात दिलेले असून येत्या महिन्याभरात कामे मार्गी लावण्याच्या शब्द देण्यात आलेला आहे.

-स्वप्नील कवडे, ग्रामसेवक फाकटे ]