DEATH

शिरुर तालुक्यातील ‘त्या’ आरोपीची येरावडा कारागृहात आत्महत्या

शिरूर तालुका

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलिसांनी गुन्ह्यामध्ये अटक ठेवलेला आरोपी शिरुर पोलिसांच्या कोठडीतून पळून गेल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्रापूर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेला तसेच सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून सचिन मधुकर नरवाडे असे या आरोपीचे नाव आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे २ जून रोजी सचिन याने त्याची पत्नी कांचन नरवाडे हिचा साडीने गळा आवळून खून केला होता. त्याबाबत गुन्हा दाखल होताच शिक्रापूर पोलिसांनी सचिन मधुकर नरवाडे याला तातडीने अटक केली होती. दरम्यान सदर आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

unique international school
unique international school

न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांना गुरुवारी ७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मोकळे सोडण्यात आले होते. काही वेळाने कैद्यांची मोजणी करण्यात आली. त्यावेळी सचिन नसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी आजूबाजूला पाहणी केली असता सचिन मधुकर नरवाडे (वय ३१) रा. बजरंगवाडी तांबे बिल्डींग शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. सावंगी ता. भोकरदन जि. जालना याने कारागृहातील बराक क्रमांक दोनच्या परिसरातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

याबाबत सदर आरोपीच्या खुनाच्या मूळ गुन्ह्यातील तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांच्याशी संपर्क साधला असता सचिन नरवाडे याने आत्महत्या केल्याबाबतची माहिती कारागृह प्रशासनाकडून मिळाली त्याबाबत आपण सदर आरोपीच्या नातेवाईकांना कळवले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांनी सांगितले.