नुकसान ग्रस्तांना रहेमान फाउंडेशनने मदत करत दिला सर्व धर्म संभावतेच आदर्श संदेश

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील तलाव फुटल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडल्याची घटना घडली असताना पुण्यातील रहेमान फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देत नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देत आधार दिला आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे मागील आठवड्यात झालेल्या पावसामध्ये तलाव फुटून गावठाणात पाणी गेल्याने अनेक घरातील साहित्य वाहून गेले तर एका दाम्पत्याचे पूर्ण घरच वाहून गेल्याने अनेकांचे नुकसान झाल्याची घटना घडल्याने नुकतीच रहेमान फाउंडेशन भारत या सघटनेच्या पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट दिली. यावेळी रहेमान फाउंडेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष मौलाना साकिब सय्यद, वसीम मोमीन, अक्रम अन्सारी, शैबाज मोमीन, फयाज खान, अब्दुल रहेमान शेख, साजिद शेख, अमजत खान, रेहान मोमीन यांसह आदींनी नुकसानीची पाहणी करत येथील नागरिकांना आधार दिला.

दरम्यान सदर पदाधिकाऱ्यांनी येथील नुकसान ग्रस्तांना किराणा सह आदि साहित्यांची मदत करत सामाजिक बांधिलकी जपली यावेळी मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे, उपसरपंच सोपान पुंडे, बबन शिंदे, शहाजी दळवी, माजी उपसरपंच दिपक तळोले, संदीप तांबे, उद्योजक अमोल पुंडे, युनूस तांबोळी, आबिद तांबोळी यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रहेमान फाउंडेशनने सामाजिक भान व जातीय सलोखा जपत येथील नागरिकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे असून या माध्यमातून सर्व धर्म समभावतेचा संदेश दिला असल्याचे मत मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे यांनी व्यक्त केले तर उपसरपंच सोपान पुंडे यांनी सर्वांचे आभार मानले.