शिक्रापूर ग्रामपंचायत कडून समाज मंदिरासाठी साहित्य

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या 15 टक्के निधीतून समाज मंदिरासाठी भांडी व साहित्य भेट देण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने कोयाळी गावठाण येथे समाज मंदिरासाठी मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या 15 टक्के निधीतून भांडी देण्यात आली नुकतेच काही साहित्य व भांडी देण्यात आली.

यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच विशाल खरपुडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, पूजा भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते राहुल सासवडे, नाना गिलबिले, आनंद सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, सोनाली सोनवणे, उमेश गिलबिले, कीर्ती सोनवणे, अरुण सोनवणे, सुमन सोनवणे, अर्चना सोनवणे, निर्मला सोनवणे, ओमकार सोनवणे, राधाबाई पवार यांसह आदी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना लवकरच येथील अन्य ठिकाणी देखील समाज मंदिराला साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.