जांबुत ग्रामपंचायतीत सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाची मागणी; आठ सदस्यांचा तहसीलदारांकडे अर्ज

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्याची मागणी करत तहसीलदारांकडे अधिकृत अर्ज सादर केला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२२ मध्ये पार पडली असून, ३० ऑगस्ट २०२२ पासून दत्तात्रय जोरी हे सरपंच म्हणून कार्यरत […]

अधिक वाचा..

ग्रामपंचायतींवर जुन्या सरपंचांच्या नियुक्तीला ब्रेक; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला स्थगिती

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारासंदर्भात महत्त्वाचा अंतरिम दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वादग्रस्त निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुन्हा जुन्याच सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर खंडपीठाने गंभीर आक्षेप नोंदवला. पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही नवीन प्रशासक नियुक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणावर […]

अधिक वाचा..

शिरूर शहराजवळील ग्रामपंचायत हद्दीतील बाबुरावनगरमधील ओपन प्लॉट झाले कचराकुंड्या

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरालगत शिरूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विकसित झालेल्या बाबुरावनगर या उपनगरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वर्गीय बाबुरावजी पाचर्णे यांच्या दूरदृष्टीतून मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत आणि शिरूर शहराला पर्याय म्हणून बाबुरावनगरची उभारणी करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात सुमारे अडीच कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, शाळा, रस्ते […]

अधिक वाचा..

सरपंचाची खुर्ची रिकामी होणार! राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचे आदेश

मुंबई: राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठा बदल घडणार असून येत्या काळात राज्यातील तब्बल 14 हजार 237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असताना निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या खुर्च्या काही काळासाठी रिकाम्या राहणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधीच रखडल्या आहेत. त्याच […]

अधिक वाचा..

ZP निवडणुक; कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटातील अत्यंत महत्त्वाचे आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्या जयश्री कोहकडे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल (दि १७) रोजी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कारेगाव ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच व उपसरपंच, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार […]

अधिक वाचा..

कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तेचा ‘सावळा गोंधळ’ सरपंच पदाचा वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिघळला

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील ‘सरपंच’ पदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ठरलेल्या वेळेत राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांसह थेट ग्रामस्थांनाच बैठक बोलावण्याची नामुष्की ओढवली आहे. सरपंच-उपसरपंच पद कोणाला द्यायचे, किती कालावधीसाठी द्यायचे, राजीनामा घ्यायचा की नाही—या सर्व प्रश्नांची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात आहेत, हा प्रश्न आता कारेगावकरांना पडला आहे. देवाच्या शपथा…पण त्या पाळल्याचं […]

अधिक वाचा..

राज्य शासनाचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत घरपट्टी, नळपट्टी करामध्ये 50% सूट

औरंगाबाद: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५–२६ साठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीत मोठा दिलासा या अभियानाअंतर्गत घरपट्टी पाणीपट्टी यावर मिळणारी ५० टक्के सवलत पुढेही कायम राहणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथील मच्छिंद्र बापूराव पवार यांनी मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांना लेखी निवेदन दिले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा उद्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी उपोषण करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. नेमकं […]

अधिक वाचा..

सविंदणे ग्रामपंचायतीत महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा, मालुबाई मिंडे उपसरपंचपदी बिनविरोध निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे ग्रामपंचायतीत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत महिलांनी पुन्हा एकदा नेतृत्वाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी उपसरपंच गोरक्ष लंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी मालुबाई नामदेव मिंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत सरपंच मनीषा नरवडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली, तर […]

अधिक वाचा..
Shirur-Sarpanch-Sodat

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कुठे जल्लोष, कुठे निराशा!

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आज (ता. ११) सरपंचपद आरक्षणाची सोडत मुख्य शिरूर तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. एकूण ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपद आरक्षण जाहीर झाले असून, अनेक गावांमध्ये खुल्या पदामुळे जल्लोष, तर काही गावांत आरक्षणामुळे हिरमोड झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत […]

अधिक वाचा..