शिरुर तालुक्यात विहिरीत पडलेल्या ऊद मांजराला जीवदान

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे विहिरीत पडलेल्या ऊद मांजरास नेचर गार्ड ऑर्गनायझेशन आणि आपदा मित्र यांच्यामुळे जीवदान मिळाले असुन वनपाल गौरी हिंगणे आणि वनरक्षक बबन दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ऊद मांजरासं निसर्गात मुक्त करण्यात आले.

जातेगाव खुर्द येथील दिपक निकाळजे यांच्या विहिरीत (दि 11) रोजी सकाळच्या सुमारास एक ऊदमांजर पडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नेचर गार्ड ऑर्गनायझेशन चे सदस्य वैभव निकाळजे यांना संपर्क साधत हि माहिती दिली. त्यानंतर नेचर गार्ड ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष गणेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य राहुल पवळे हे सर्व सदस्यांच्या मदतीने विहिरीमध्ये उतरले आणि त्या विहिरीत पडलेल्या ऊद मांजरास पकडून जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.

यावेळी राहुल गायकवाड, निखिल काळे, विशाल काळे, राज जावळे, अविनाश बर्डे, अक्षय निकाळजे, वैभव निकाळजे या सर्वांनी यावेळी मदत केली.