सविंदणे (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) येथिल घोडनदी किनाऱ्यावरुन शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या 8 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी (दि. २८) मे रोजी एकाच वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या होत्या. अंदाजे दीड लाख रुपयांच्या विद्युत मोटारी चोरीस गेल्याची फिर्याद शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. तसेच वारंवार विद्युत मोटारी चोरीचे सत्र सुरु झाले होते.
बेट भागात विद्युत मोटार चोरट्यांनी धुमाकुळ घालत शेतकऱ्यांच्या मोटारी चोरल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून जळून गेल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडण्याचे काम चोरटयांनी केले होते. शिरुर पोलिसांपुढे या मोटार चोरट्यांनी मोठे आव्हान निर्माण केले होते.
आमदाबाद येथील ग्रामस्थांनी हे मोटार चोर पकडण्यासाठी पोलिसांकडे लेखी निवेदन देवून आग्रही मागणी केली होती. अखेर पोलिस यंत्रणा कामाला लागुन विदयुत मोटार चोरांना गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना यश आले असून चोरट्यांकडून शेतकऱ्यांच्या चोरलेल्या मोटारी हस्तगत करुन शेतकऱ्यांना परत सुपुर्द करण्यात आल्या. सर्व शेतकऱ्यांना शिरुर पोलीस स्टेशनला बोलवून विद्युत मोटारी सुपूर्त केलेले आहेत.
शिरुर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे संपूर्ण जिल्हयामध्ये कौतुक होत आहे. यावेळी उपविभागीय पोलिस आधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, स. पो. नि.अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, अभिजीत पवार, सहा फौज. नाजिम पठाण, सुरेश नागलोत व आमदाबाद ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.