शिक्रापुरात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यातील चोऱ्यांसह आदी बेकायदेशीर वाहतुकी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी विशेष सूचना दिलेल्या असताना ठिकठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने नाकाबंदी करण्यात येत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ थोरात, पोलीस हवालदार गणेश शेंडे, शिवाजी चितारे, शंकर साळुंके, पोलीस नाईक मयूर कुंभार, प्रफुल्ल सुतार, अविनाश पठारे यांसह आदी पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नुकतीच नाकाबंदी करण्यात आली.

यावेळी चार चाकी व दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात आलेली असून काही बेशिस्त वाहन चालकांसह नंबर नसणे, तीन शीट दुचाकी चालवणे, वाहन परवाना नसणे अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली असून पोलिसांनी अचानक सुरु केलेल्या नाकाबंदी मुळे बेशिस्त वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतला असून यामुळे वाहन चालकांना देखील शिस्त लागण्यास मदर होणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तर अशा प्रकारे परिसरात नाकाबंदी लावून वेळोवेळी वाहनांची तपासणी करुन कारवाई करणार असून कारवाई मध्ये कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले.