केंदूरच्या शाळेच्या जेष्ठ शिक्षीका पुजा चव्हाण सेवानिवृत्त

शिरूर तालुका

शिक्षकेला निरोप देताना शाळेतील विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर काँलेज या शाळेच्या जेष्ठ शिक्षीका पुजा अनिल चव्हाण या आपल्या सेवेतून निवृत्त झाल्या असल्याने त्यांचा शाळेच्या वतीने नुकताच सन्मान करत त्यांचा निरोप समारंभ करण्यात आले आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर काँलेज येथे पूजा चव्हाण यांनी गेली चार वर्षे काम केले नुकताच त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ पार पडला यावेळी प्राचार्य रणजीत गावित, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, मदन पऱ्हाड, माउली थिटे, माजी सैनिक दिपक मोरे, गौरव कदम, आरती कदम, स्वाती मोरे, अनुजा चव्हाण, अनिल चव्हाण, प्रतिभा भोसुरे, तन्मय भोसुरे यांसह आदी शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चव्हाण यांच्या कामाचा उल्लेख करताना १९८६ पासून शिक्षण क्षेत्रात काम करत असताना चव्हाण यांनी ३७ वर्षे सेवा केली तर त्यांचे काही विद्यार्थी परदेशात तर विद्यार्थी चांगल्या पदावर काम करत असल्याचे प्राचार्य रणजीत गावित यांनी सांगीतले. तर शिक्षीका सारिका पाटील व विद्यार्थी प्रतिनिधी अवंतीका थिटे, समृद्धी साकोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पूजा चव्हाण यांना निरोप देताना सर्व विद्यार्थ्यांचे डोळे पाणावलेले पाहावयास मिळत होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ पिचड यांनी केले, तर प्राचार्य रणजीत गावित यांनी प्रास्ताविक केले तर बाळासाहेब धस यांनी आभार मानले.