महावितरण कर्मचाऱ्याची कार्यक्रमातून ‘लेक वाचवा’ यासाठी जनजागृती…

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महावितरणच्या बारामती-केडगाव विभागाच्या रांजणगाव गणपती शाखेचे कर्मचारी रामेश्वर ढाकणे हे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमातुन लेक वाचवा तसेच वीजबिल भरा हा अनोखा संदेश देऊन जनजागृती करत आहेत. नुकताच रांजणगाव गणपती येथील देवाची वाडी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हा अनोखा संदेश दिला विशेष म्हणजे कुठलही मानधन न घेता दिवसभराचे कार्यालयीन काम उरकून ते असे जनजागृतीचे कार्यक्रम करत आहेत.

आईच्या गर्भातील एक लेक वाचली पाहिजे हाच या कार्यक्रमाचा उद्देश असुन शिक्रापुर येथील एका मुलीचा नराधम बापानेच खून केल्याच्या घटनेचा उल्लेख करत शिक्रापूर पोलिसांनी या घटनेचा लवकर शोध लावला आणि लोकाना अफवेपासून भयमुक्त केले म्हणुन त्यांनी पोलिसांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या सोबत गायक शांताराम गायकवाड, रिद्धी किशोर चव्हान, संदेश ढाकणे यांनी कार्यक्रमात सहकार्य केले.