रोजच्या आहारात ज्वारी व बाजरीचे सेवन करणे वाढवा; डॉ ऐश्वर्या आगरकर

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): आपल्या शरीरात ग्लुटेन जास्त गरजेचे नसुन ग्लुटेन विरहीत तृणधान्याचे रोजच्या आहारात प्रमाण वाढल्यास भविष्यात आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल. त्यामुळे आहारात ज्वारी व बाजरी हंगाम निहाय वाढवा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ ऐश्वर्या आगरकर यांनी केले.

निमोणे (ता. शिरुर) येथील श्री नागेश्वर विद्यालयात शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच श्री नागेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत पौष्टिक तृणधान्य चौरस आहाराचे महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या डब्यात भाकरी आढळून आल्या त्या सर्व विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकास हे पुस्तक व इतर शालेय वस्तू देण्यात आल्या. यावेळी कृष्णा कांबळे आदित्य काळे, राजनंदिनी गायकवाड,रोहीत काळे, सार्थक पवार,यश पवार, राधिका आयवळे, आश्विनी भगुरे, मयुर काळे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच संजय काळे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ इंदिरा डॅनियल, डॉ ऐश्वर्या आगरकर आरोग्य सहायक डी एन मारणे, आरोग्य सहायिका कोरेकर नागेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापक अनिल शिरगिरे, प्रफुल्ल सरवदे, अंकुश वाघसर, कनिलाल पाटील,राजाराम ढवळे, शरद दुर्गे, सुभाष सोनवणे, तसेच कृषी विभागचे कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कृषी सहायक जयवंत भगत, सुनिल नाईक, मोनिका झगडे ग्रामस्थ अनिल जाधव सह इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत चे विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल सरवदे, प्रास्ताविक कृषी सहायक जयवंत भगत, तर कार्यक्रमाचे आभार राजाराम ढवळे यांनी मानले. शाळेचे शिक्षक वाघ, ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांनी योगदान दिले.