पिंपळे खालसाच्या संस्कार गावडेची नवोदय साठी निवड

शिरूर तालुका

शिक्रापूर: पिंपळे खालसा (ता. शिरुर) या महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संस्कार अविनाश गावडे या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली असून संस्कारच्या यशामुळे शाळेने यशाची परंपरा कायम राखली. संस्कार गावडे सह त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिक सुशीला माकर व दिनेश निघोजकर यांचा शालेय व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थ व शिक्षकांनी सन्मान केला.

unique international school
unique international school

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता लंघे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियांका धुमाळ यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. पिंपळे खालसा जिल्हा परिषद शाळेच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.