शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या युवकांनी एकत्र येत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त वढू बुद्रुक ते शिक्रापूर ज्योत आणून मूकपदयात्रा काढून बलिदान दिन साजरा केला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मूकपदयात्रेचे आयोजन करत सकाळच्या सुमारास वढू बुद्रुक ते शिक्रापूर पायी व दुचाकी आयोजन करत वढू बुद्रुक येथून हातात ज्योत घेऊन पायी व दुचाकी रॅली शिक्रापूर येथे आणली.
दरम्यान अनेक युवकांनी सदर मुकपदयात्रेत सहभागी होऊन छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानवंदना दिली. दरम्यान गावामध्ये ज्योत दाखल होताच सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते ज्योतचे पूजन करत युवकांचे स्वागत करण्यात आले. सदर मूकपदयात्रा संपन्न होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, सामाजिक कार्यकर्ते अंकुश घारे, प्रदीप थोरात यांसह आदी युवकांनी विशेष परिश्रम घेतले.