तळेगावातील फडणवीस वाडा मोडकळीस; नागरिकांच्या जिवास धोका

मुख्य बातम्या शिरूर तालुका

तळेगाव ढमढेरे: शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे जीर्ण झालेला फडणवीस वाडा मोडकळीस आला असुन त्या वाड्याभोवती लोकवस्ती असल्याने वर्दळ असते. त्याचबरोबर मुख्य पेठेत जुनी इमारत झाली असल्याने नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने एखादी अनुचित घटना घडली. तर या घटनेला जबाबदार कोण…? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्य अँड सुरेश भुजबळ यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

तळेगाव ढमढेरे येथील जुन्या काळातील फडणवीस वाड्याची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे फडणवीस वाड्या सह इतर संबंधित वाडा मालकांना सुचना करण्यात यावी असेही त्या पत्रात म्हटले आहे. मुख्य बाजार पेठेच्या रस्त्यालगत मोडकळीस आलेल्या या इमारतीचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, विद्यालय, महाविद्यालय आहेत. समोरच पोस्ट ऑफिस आणि राम मंदिर आहे. मुख्य पेठेतून ये-जा करताना वृद्ध नागरीक तसेच विद्यार्थ्यांना व नागरीक यांच्या जिवास मोडकळीस आलेल्या या वाड्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गावातील इतर अनेक वाडे जीर्ण झालेले आहेत. त्याची पाहणी करून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.