वाघाळेः विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (दि. २१) वाघाळे गावास भेट देऊन नुकासानीची पहाणी केली. गावातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसान भरपाई द्यावी, असे सुचित केले. यावेळी अनेक शेतकऱयांनी झालेल्या नुकसानीविषयी व्यथा मांडल्या.
वाघाळे गावात तीन वेळा ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वाघाळे गावची पायी फिरून पहाणी केली. यावळी सोबत प्रांत संतोषकुमार देशमुख, शिवसेना जिल्हा अध्यक्ष माऊली आबा कटके, वाघाळे गावचे माजी सरपंच पप्पू भोसले, चेअरममन दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते सुरेश थोरात, सुर्यकांत बढे, विजय शेळके, शामराम शेळके, रमेश शेळके, उपसरपंच दादासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, वाघाळे गावामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण गावाला सरसकट नुकसान भरपाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय, संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.