शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शिवाजी प्रताप सरोदे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथे संतोष सुळके यांच्या मालकीच्या खोल्या असून त्यांच्या खोलीमध्ये शिवाजी सरोदे हे भाडेकरु राहत होता. (दि. १९) ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास सुळके हे त्यांच्या खोल्यांकडे गेले असता त्यांना त्यांना शिवाजी सरोदे यांच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे सुळके यांनी खोलीत पाहिले असता त्यांना शिवाजी याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
या घटनेत शिवाजी प्रताप सरोदे रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. नांदेड जि. नांदेड याचा मृत्यू झाला असून याबाबत संतोष शांताराम सुळके (वय ४२) रा. धामारी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.