वाघाळेः केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता विद्यालयाने बाजी मारली आहे.
कालिकामाता विद्यालयाचे 15 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी एका विद्यार्थिनीस केंद्र शासनामार्फत 12 हजार रुपये प्रतिवर्ष असे चार वर्षात एकूण 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सात विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत सारथी शिष्यवृत्ती मधील प्रत्येकी 9600 प्रमाणे चार वर्षात 38 हजार 400 रुपये अशी शिष्यवृत्ती मिळणार आहे. यात प्रामुख्याने सृष्टी नानासाहेब पारधे हिस केंद्रीय शिष्यवृत्ती तर संस्कृती शेळके, समृद्धी शेळके, प्रणिता पवार, तनुजा काटे, धनश्री घोलप, साईराज थोरात, ओम थोरात यांना सारथी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
कालिकामाता विद्यालयात डिजिटल बोर्डद्वारे शिक्षणाची सुविधा असल्यामुळे दिवसेंदिवस विद्यालयाची गुणवत्ता वाढत आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मुख्याध्यापक कैलास गिरमकर, विभाग प्रमुख प्रविण पाटील, मारुती सोमवंशी, अरुण पोळ, संध्या बांगर आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा विकास समिती, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, शिक्षक- पालक संघ, सरपंच-उपसरपंच व सर्व सदस्य, सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी- 07 (रक्कम 38,400 रु)
1) साईराज गणेश थोरात
2) ओम विकास थोरात
3) संस्कृती भाऊसाहेब शेळके
4) समृद्धी बापूसाहेब शेळके
5) प्रणिता संजय पवार
6) तनुजा राजेंद्र काटे
7) धनश्री संपत घोलप
उत्तीर्ण विद्यार्थी
1) सोहम प्रकाश जाधव
2) प्रसाद बाळासाहेब थोरात
3) जयावर्धन रवींद्र डोळस
4) कुणाल दत्तात्रय कारकुड
5) वैभव उमेश गवारे
6) श्रावणी अंतु कारकुड
7) श्रावणी गणेश धरणे
Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न…
वाघाळे येथे केंद्रपातळी क्रीडा स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांचा सहभाग…
वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!
कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!
वाघाळेच्या मुलींचा सतत सहा वर्ष तर मुलांचा आठ वर्ष खो खो मध्ये डंका