शिक्रापुरात विद्युत वितरणच्या वतीने दुचाकी रॅली

शिरूर तालुका

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅलीने विद्युत प्रबोधन

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन करत वीज चोरी, नवीन वीज कनेक्शन, सोलर कनेक्शनची माहिती नागरिकांना देत प्रबोधन करण्यात आले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे विद्युत वितरण विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत वितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व राजेंद्र एडके मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहाय्यक अभियंता बसवराज बिराजदार, दिपक पाचुंदकर, अशोक पाटील, दादा बारवकर, श्रीकांत ताटीकोंडा, विजय शेरकर यांसह आदी शाखांचे कर्मचारी उपस्थित होते.

सदर नागरिकांना रॅलीमध्ये वीज चोरी, नवीन वीज कनेक्शन, सोलर कनेक्शन याबाबतची माहिती देण्यात आली असून या अभियानांतर्गत प्रत्येक शाखेतील एक गाव निवडले असून त्या गावातली सर्व देखभाल दुरुस्ती वीज बिल दुरुस्ती, नवीन वीज कनेक्शन देणे व विजे संबंधित असणाऱ्या अडचणी बाबत तक्रार निवारण करण्यात येणार आहे तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व शाखा कार्यालया अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रात नदी व शाखा कार्यालय जवळ वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले.