panchayat samit shirur

शिरूर तालुक्यातील अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांगांचा छळ…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या समाज कल्याण अधिकारी व गटविकास अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांगांचा छळ होत असून, तो थांबवावा अशी मागणी दिव्यांग व्यक्तींकडून होत आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुर पंचायत समिती च्या, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक यशवंत वाटमारे व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी यशवंत घरकुल योजनेचे प्रस्ताव ७/८ महिन्यांपासून पुणे जिल्हा परिषदे कडे न पाठवता, शिरुर पंचायत समिती मध्येच दडपून ठेवले आहे, दिव्यांग व्यक्तींना यशवंत घरकुल योजनेच्या मार्फत घरकुलाचा लाभ दिला जातो.

दिव्यांगाच्या प्रस्तावाच्या फाईल वर वजन न ठेवल्याने, फाईल पुढे सरकत नाही, अशी दबक्या आवाजात शिरुर तालुक्यात चर्चा सुरु आहे. या बाबत शिरुर पंचायत समिती चे गट विकास अधिकारी अजित देसाई यांची भेट घेतली असता, पुणे जिल्हा परिषदेच्या वरीष्ठ अधिकारी यांनी तोंडी सांगितले आहे की, यशवंत घरकुल योजनेचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवू नये, अशी माहिती देऊन, उडवाउडवीची उत्तरे दिली. या बाबत आपणास जिल्हा परिषदेने काय लेखी पत्र दिले आहे का? अशी विचारणा केली असता, गटविकास अधिकारी अजित देसाई हे निरुत्तर झाले. म्हणजे जानिवपुर्वकच गटविकास अधिकारी अजित देसाई व वरीष्ठ साहाय्यक समाज कल्याण अधिकारी यशवंत वाटमारे यांनी यशवंत घरकुल योजनेचे प्रस्ताव दडपुन ठेवले हे उघड झाले. दिव्यांग व्यक्ती आपला प्रस्ताव केव्हा मंजूर होईल, यासाठी शिरुर पंचायत समिती मध्ये वारंवार चकरा मारुन, पंचायत समिती चे उंबरे झिजवत आहे. परंतु, या दगडाचे काळीज असणाऱया अधिकाऱ्यांना पाझर फुटत नाही. एक प्रकारे हे शासकीय अधिकारी दिव्यांग व्यक्ती चा छळच करत आहेत.

प्रहार दिव्याग क्रांती संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय तरटे यांच्या कडे अधिकची माहिती घेतली असता, त्यांनी ही माहिती दिली की, यशवंत घरकुल योजनेचे सन २०२०/२०२१ चे २२ लाभार्थी चा घरकुलाचा प्रस्ताव मंजूर होऊन सुध्दा १ वर्षे झाले. परंतु, अद्याप पर्यंत कोणत्याही लाभार्थी ना, यशवंत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. या बाबत पुणे जिल्हापरिषदेच्या वरीष्ठ अधिकारी यांनी शिरुर गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या मनमानी कारभारात हस्तक्षेप करने गरजेचे आहे व दिव्यांग व्यक्तीचा एक प्रकारे चालू असलेला छळ थांबवावा, अशी दिव्यांग व्यक्तीकडून शिरुर तालुक्यात मागणी होत आहे.