कोयाळी पुनर्वसनची शाळा ठरली नंबर एक

शिरूर तालुका

नवोदय विद्यालयाच्या पात्रतेमध्ये ८ विद्यार्थ्यांचा विक्रम

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील तब्बल ८ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात साठी निवड झाली असून सदर एकाच शाळेतील ८ विद्यार्थी यामध्ये पात्र ठरण्याची हि पहिलीच शाळा असून कोयाळी पुनर्वसन शाळेने राज्यात विक्रम नोंदवला असल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष विधाटे यांनी दिली आहे.

unique international school
unique international school

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता, नवोदय विद्यालय निवडीसाठी बुद्धिमत्ता, गणित, भाषा अशा तीन विषयांची १०० गुणांची परीक्षा घेऊन सदर परीक्षेनंतर सीबीएससीच्या अंतर्गत विद्यार्थी निवड केली जाते. जवाहर नवोदय विद्यालयात दरवर्षी इयत्ता सहावी प्रवेशासाठी ४० टक्के मुली व ६० टक्के मुले अशी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. तर निवड झाल्यानंतर इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत जवाहर नवोदय विद्यालयात केंद्र शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील यशराजे संतोष गायकवाड, समर्थ दत्तू झेंडे, सार्थक गणेश फाळके, जिग्नेश नवनाथ कार्ले, सम्राट संदीप गायकवाड, अनुश्री गणेश भुजबळ, तेजस्विनी सुनील पोवार, साक्षी गणेश झोपे या विद्यार्थ्यांची निवड झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रत्नप्रभा कामठे, उद्धव गर्कळ, विजय आढळ, प्रियंका बिऱ्हाडे, स्वीटी खरात या शिक्षकांनी मार्गदर्शन केले, तर सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक संतोष विधाटे, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्ताराधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश करंजे, उपाध्यक्षा सोनाली सोनवणे, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, त्रिनयन कळमकर यांनी अभिनंदन केले असून या शाळेची नवोदय विद्यालय निवडीची परंपरा कायम ठेवल्यामुळे शाळा समिती आणि ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.