साप हा शेतकऱ्यांचा मित्र; शेरखान शेख

शिरूर तालुका

वढू बुद्रुकच्या विद्यालयात सापांबाबत जनजागृती

शिक्रापूर (शेरखान शेख): साप हा शेतातील उंदीर, बेडूक नाहीसे करत असल्याने सापामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे रक्षण होत असते त्यामुळे साप हा शेतकऱ्यांसह मानवाचा मित्र असल्याचे प्रतिपादन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय येथे आयोजित साप समज गैरसमज याबाबत जनजागृती कार्यक्रमात बोलताना निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख बोलत होते. याप्रसंगी सर्पमित्र अमोल कुसाळकर, ज्येष्ठ शिक्षक विलास कुरकुटे, सोमनाथ भंडारे, मिठठू सोनवणे, संजय कदम, हरिष शिंदे, रविंद्र भामरे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयामध्ये सापांच्या जाती, प्रजातीसह विषारी, बिनविषारी सापांची माहिती देत ओघवत्या भाषेमध्ये मुलांना उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले असून सापांच्या फोटो वरुन त्यांची लक्षणे त्यांच्या हालचाली त्याचप्रमाणे ते कोठे वास्तव्यात राहतात याबाबत विस्तृत माहिती त्यांनी सांगत मुलांच्या सापाबाबतच्या शंकांचे, प्रश्नांचे निरसन करण्यात आले.

यावेळी शेरखान शेख यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने शेरखान शेख व सर्पमित्र अमोल कुसाळकर यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिष शिंदे यांनी केले तर रविंद्र भामरे यांनी आभार मानले.