शिरुर तालुक्यात वाढली बांदल व मांढरेंची ताकद

मुख्य बातम्या शिरूर तालुका

आमदार अशोक पवार यांना शह देण्याचा आता प्रयत्न

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील राजकारण अनेक दिवसांपासून वेगळ्या वळणावर गेलेले असताना आमदार अशोक पवार यांना टक्कर देण्यासाठी कोणी नसल्याचे दर्शवले जात असताना आता अशोक पवार यांचे खंदे समर्थक असलेले आबाराजे मांढरे यांनी मंगलदास बांदल यांच्याशी जवळीक साधत आमदार अशोक पवार यांच्या पॅनलचा पराभव करत एक हाती सत्ता मिळवली असल्याने आता शिरुर तालुक्यात मंगलदास बांदल व आबाराजे मांढरे यांची ताकद वाढली आहे.

शिरुर तालुक्यातील राजकारणातील जादुगार समजले जाणारे मंगलदास बांदल यांनी यापूर्वी अनेक राजकीत बदल घडवून आणलेले असताना त्याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही, गेली काही महिने बांदल कारागृहात असल्याने विरोधकांना कोणतीही निवडणूक सोपी वाटत होती. सध्या बांदल कारागृहातून बाहेर आलेले असताना प्रथमच जिजामाता महिला सहकारी बँकेच्या निवडणुकीतून जनतेच्या समोर जात असताना या निवडणुकीला मोठी रंगत आलेली होती, कारण अशोक पवार यांचे खंदे समर्थक असलेले आबाराजे मांढरे, जाकिरखान पठाण, मंगलदास बांदल, शेखर पाचुंदकर हे पवारांच्या विरोधात एकवटले होते.

जिजामाता बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर बांदल व मांढरे यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत देत निवडणूक उतरले होते. दरम्यान रेखा बांदल व आबाराजे मांढरे बिनविरोध होणार असे संकेत असताना भाजपचे कट्टर असलेले व आमदार अशोक पवार यांचे कट्टर विरोधक काकासाहेब खळदकर यांनी पवार यांच्याशी हात मिळवणी करत त्यांच्या पत्नीची उमेदवारी जाहीर केली.

त्यामुळे बांदल यांच्या बिनविरोधला अडथळा निर्माण झाल्याने आता निवडणुकीत वेगळीच रंगत आली आणि प्रत्येक गट ताकदीने प्रचार करु लागले, तर बांदल यांचे विरोधक आबाराजे मांढरे हे दोघे एकत्र झाले, तर अशोक पवार यांचे विरोधक काकासाहेब खळदकर हे दोघे एकत्र झाले तर जाकिरखान पठाण यांनी देखील बांदल यांना साथ दिली यामुळे सगळीकडे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. यामुळे राजकीय गणिते बदलत असताना जोरदार प्रचार दोन्ही बाजूने करण्यात आला. तर या निवडणुकीत बांदल, मांढरे व पाचुंदकर कसा करिष्मा दाखवतात याकडे सर्वांच्या लक्ष लागले होते. मात्र बांदल व मांढरे यांनी एकहाती वर्चस्व निर्माण करत सर्व उमेदवारांना निवडून आणले. त्यामुळे शिरुर तालुक्यात सध्या या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे.

सदर निवडणुकीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी नाराजांना एकत्र करत विरोधकांनी मोट बांधून ठेवली असताना राजकीय कसब पणाला लावून निवडणूक प्रतिष्ठेची करत विजयाला मोठा हातभार लावला होता मात्र सध्या शिरुर तालुक्यात मंगलदास बांदल व आबाराजे मांढरे यांची ताकद वाढली असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

जिजामाता बँकेचे बांदल व मांढरे गटातील विजयी उमेदवार…

सुजाता जगताप (सर्वसाधारण महिला गट २५ किमी पुढील), प्रणिता पठारे, मंगला भोजने, रत्नमाला म्हस्के, पुजा वांजळे, सुनीता शितोळे, सुरेखा शितोळे, सुरेखा शेलार, रेखा बांदल (सर्वसाधारण महिला गट २५ किमी पुढील), धैर्यशील उर्फ आबाराजे मांढरे (खुला गट), अशोक काकडे (अनुसूचित जाती जमाती), जाकिरखान पठाण (इतर मागास वर्ग), मनीषा कालेवार (विभुक्त जाती भटक्या जंमती विशेष)