वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यासाठी बावीस कोटींचा निधी

शिरूर तालुका

भाजपाच्या जयेश शिंदेंकडून नितीन गडकरींचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) या छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या गावापासून चौफुला या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ता निधीतून बावीस कोटी रुपयांचा निधी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याने भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी नुकताच नितीन गडकरी यांचा दिल्ली येथे भेट घेत सन्मान केला.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) ते कोरेगाव भीमा रस्त्याच्या निधीसाठी सरकार ने यापूर्वी तरतूद केली असताना सध्या त्या रस्त्याचे काम देखील सुरु आहे. मात्र वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सदर रस्त्यासाठी केंद्रीय रस्ता निधीतून नुकतेच बावीस कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

सदर निधी मंजूर झाल्याने येथील रस्ता सात मीटर रुंदीचा होणार आहे, तर कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक व चौफुला हा रस्ता व्हावा हे दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वप्न होते, त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत होतो त्यामुळे आमच्या पाठपुराव्याला यश येत दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आम्हाला होत असल्यामुळे आम्ही दिल्ली येथे जात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा सन्मान केला असल्याचे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी दिली.