वढू बुद्रुकच्या आगीची चौकशी सखोल करा अन्यथा…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर कंपनीला (दि. 17) डिसेंबर रोजी आग लागून कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले असताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सदर कंपनीवर गुन्हे दाखल करत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असताना आता काही ग्रामस्थांनी थेट पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत कंपनीला आग लावल्याची शंका उपस्थित करत या आगीची सखोल चौकशी करावी तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना त्रास देऊ नये, तसेच त्यांच्यावर कारवाई करु नये, अन्यथा आम्ही उपोषण करु, असा इशारा देखील दिला आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर कंपनीला सतरा डिसेंबर रोजी आग लागून कंपनी खाक होऊन कोट्यवधींचे नुकसान होत दिडसे कामगार उघडल्यावर आले, यापूर्वी कंपनीच्या वतीने गावातील काही पदाधिकाऱ्यांवर खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असल्याने ग्रामपंचायत प्रशासने पोलीस अधीक्षक यांची भेट घेत कंपनीने ग्रामपंचायत कर थकवलेला असून त्यांनी कंपनी मध्ये सुरक्षा यंत्रणा उभारली नसल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे.

तसेच कंपनीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली असता नुकतेच माजी ग्रामपंचायत सदस्य संजय भंडारे, उमेश भंडारे, अरविंद भंडारे, विजय भंडारे, संजय गाडे, योगेश भंडारे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची भेट घेत संबंधित कंपनीमध्ये मागील काही वादातून ग्रामपंचायत संबंधित पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले होते त्याचा राग मना धरुन काही घटनाा घडल्या नाहीत ना, अशी शंका उपस्थित करत या आगीची तसेच कंपनीने ग्रामपंचायतचा सर्व टॅक्स भरलेला असताना कंपनीचा टॅक्स थकीत असल्याचे दाखवून कंपनीची बदनामी करण्यात येत असल्याने या बाबींची चौकशी करावी.

तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यावर आरोप करत असून हेमंत शेडगे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी असून पोलीस प्रशासनाने कायमच सामाजिक, एकता, बंधुता व एकात्मता यासाठी योगदान आहे. मात्र पोलीस निरीक्षकांना आगीच्या प्रकरणी जाणून बुजून गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना त्रास देत त्याच्यावर कारवाई ची मागणी करण्यात येत आहे. मात्र अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास देणे योग्य नसून त्याच्यावर कारवाई केल्यास आम्ही उपोषणाला बसून तीव्र आंदोलन करु असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.