शाळेच्या पहिल्या दिवशी चेतन वसंत पडवळ यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

शिरूर तालुका

शालेय विदयार्थ्यांना शालेय साहीत्यासहीत दिले स्वादिष्ठ भोजन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शाळेच्या पहील्या दिवशी वाढदिवसाचे औचित्य साधत उदयोजक चेतन वसंत पडवळ यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. सविंदणे येथे शालेय नवागत विदयार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करत श्री गुरुदेव दत्त विदयालय व जि.प. प्राथमिक शाळेतील मुला -मुलींसाठी स्वादीष्ठ भोजन, शालेय साहित्य, तसेच उच्चविद्यालयासाठी २५, ०००रु. देणगी तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी २१, ०००रू. देणगी त्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

यावेळी मा. सरपंच वसंत पडवळ, रा. कॉ. युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर सरपंच शुभांगी पडवळ, सोनाली खैरे ,ग्रा. सदस्य माऊली पुंडे, मालूबाई मिंडे, रेखा भोर, गोरक्ष लंघे व राजू धोत्रे, बाळासाहेब पडवळ, पी.डी. नरवडे, दत्ता नरवडे, जितेश पवार, जयदिप लंघे, मोहन किठे, फुला लंघे, ग्रामस्थ व जिल्हा परिषदेचे शिक्षक दत्तात्रय चिकटे रमेश बोखारे, गणेश पवार, लहू शितोळे श्री गुरुदेव दत्त विदयालयाचे मुख्याध्यापक सखाराम पुंडे व सर्व शिक्षक उपस्थित होते.