विजयस्तंभाच्या विकासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार; रामदास आठवले

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी शंभर एकर जमीन हवी असून त्यांनतर येथे भव्य स्मारक उभे राहील त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री यांना भेटून मागणी करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथील २०५ व्या शौर्यदिनी जय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. याप्रसंगी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त बी. ए. सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आणि समाजाच्या वतीने अभिवादन करायला आलो आहे, येथे विकासासाठी 100 एकर जमीन हवी आहे, येथे स्मारकही उभा राहील पाहिजे, अन त्यासाठी लागणारा निधी समाज कल्याण विभाग सरकार देईल असे सांगत भारतीय जनता पार्टी वारंवार टीका करत आहे यावर मी शांत नाही, मी गप्प बसणारा नाही, मी वेळोवेळी माझी भूमिका मांडलेली आहे, असे सांगत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर बोलणं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी टाळले आहे.