आजचा दिवस सामाजिक व स्वातंत्र्याचा लढा आहे; प्रकाश आंबेडकर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): 1 जानेवारी हा शौर्यदिन जा आजचा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याचा हा लढा असून या देशाला हजारो वर्ष गुलामी होती आणि राजकीय गुलामी देखील असताना मात्र भिमा कोरेगाव च्या लढाईत ही गुलामी संपली आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहास येथून सुरवात होते. आजचा दिवस सामाजिक व स्वातंत्र्याचा लढा असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या २०५ व्या शौर्यदिनी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आले होते यावेळी बोलताना देशभरातून ळखी लोक येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात तसेच आज आनंदाचा दिवस असल्याचे मी मानतो असे सांगितले.

यावेळी करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर यांनी केलेल्या वक्तव्या बाबत त्यांना विचारले असता देश गुलाम का झाला तर ते चातूरवर्णीयांनी झाला. चातूरवर्णीयांमध्ये असलेला शत्रिय हा लढाऊ होता. तो हारला की देश हारला लोक हारले समाज हारला अश्या रीतीने झालेलं आहे. त्यामुळे कोणी काय विधान करावं ते त्याने विचारपूर्वक करावं नाहीतर ते विधान त्यांच्याच आंगलट येत, अशी परिस्थीती आहे. तसेच करणी सेना यांच्या मागे कोणीच नाही हे यातून सिद्ध होत असल्याचे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.