शिक्रापुरात कामगार दिनी आदर्श कामगारांचा सन्मान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): 1 मे या कामगार दिनी कामगारांचा सन्मान होणे गरजेचे असल्याने नुकतेच लोक जनशक्ती पार्टी लेबर सेल व जनशक्ती मजदूर सभा यांच्या वतीने संघर्षमय कार्य करत आपल्या कामातून आदर्श निर्माण करणाऱ्या कामगारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे लोक जनशक्ती पार्टी लेबर सेल व जनशक्ती मजदूर सभा यांच्या वतीने नुकतेच कामगारांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जनशक्ती मजदूर सभाचे इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, पुणे जिल्हा परिषद सदस्या तथा जिजामाता बँकेच्या संचालिका रेखा बांदल, बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मांढरे, कॅप्टन परशुराम शिंदे, दुर्गाताई भोर, मंगलताई सासवडे, विजय टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, लोक जनशक्ती पार्टी लेबर सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष शरद टेमगिरे, निलेश जगताप, स्वाती सोनवणे, अमोल काशीद, सुनीता वावळ यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी दरम्यान गणेश टेमगिरे, रवींद्र साकोरे, रत्नाकर ढोणे, नागेश करंजकर, शाम लांडे, दत्तात्रय मोरे, संभाजी धुमाळ, प्रीतम राऊत, अमोल थोपटे, साधना शिंदे, सुरेखा गायकवाड यांसह आदी आदर्श कामगारांना कामगार गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर यावेळी बोलताना कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांना देण्यात येणारा पुरस्कार हा खऱ्या अर्थाने समाजातील जी कष्टकरी व प्रतिकूल परिस्थिती मधून एक संघर्ष करत केलेल्या कार्याचा असून पुढील पिढीला प्रेरणा देणारा तर कामगारांना उर्जा देणारा असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्या तथा जिजामाता बँकेच्या संचालिका रेखा बांदल यांनी केले.

कामगारांवर होणाऱ्या अन्यायासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन कामगारांना न्याय दिला पाहिजे, तसेच स्थानिक भूमिपुत्रांना कंपनीमध्ये कामांसाठी डावलले जात असल्याने त्यांना हक्काचे काम मिळून देण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटून व्यथा मांडणार असल्याचे जनशक्ती मजदूर सभाचे इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक निलेश जागताप यांनी केले आणि लोक जनशक्ती पार्टी लेबर सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष शरद टेमगिरे यांनी आभार मानले.