leopard

शिरूर! बिबटयाच्या हल्ल्यात दहा बकऱ्या आणि घोडा ठार…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शास्ताबाद येथील बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या १० ठार तर पाच जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. ६) पहाटे शास्ताबाद शिवारात उघडकीस आली. दुसऱ्या घटनेत निमगाव दुडे येथील राहुल घुले यांचा घोडा बाहेर असताना बिबट्याने हल्ला करून ठार केला आहे. शिरूर तालुक्यातील शास्ताबाद येथील शेतकरी चंद्रकांत गोरडे यांची शास्ताबाद शिवारातील गट नंबर.९१ […]

अधिक वाचा..
helmate-snake

Video: हेल्मेटमध्ये लपलेला कोब्रा चावला दुचाकी चालकाला…

चेन्नईः हेल्मेटमध्ये एका छोट्या आकाराच्या किंग कोब्रा प्रजातीच्या साप बसला होता. दुचाकी स्वाराने हेल्मेट घातले आणि प्रवास सुरू केला. पण, सापाने दंश केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती ग्लानी येऊन तिच्या दुचाकीवर मानखाली घालून बसल्यासारखी दिसत आहे. दुचाकीस्वाराला इतर लोक शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण, […]

अधिक वाचा..
leopard-waghale

वाघाळे येथील उपसरपंचांच्या धाडसामुळे बिबट्या झाला जेरबंद; 16 कोंबड्यांचा पाडला फडशा…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) गावचे उपसरपंच दादासाहेब सोनवणे यांच्या धाडसामुळे बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्याने तब्बल सोळा कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. वाघाळे येथील सोनवणे वस्तीवर आज (रविवार) पहाटे चारच्या सुमारास उपसरपंच दादासाहेब सोनवणे यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात बिबट्या शिरला होता. दादासाहेब सोनवणे यांना कोंबड्यांचा आवाज आल्याने जाग आली व जाळीमध्ये बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान […]

अधिक वाचा..
Leader

शिरूर तालुक्यात निवडणुकीच्या धामधुमीत चारा, पाणीटंचाईकडे दुर्लक्ष…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): मागील वर्षाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने यंदा बहुतांश गावांत चारा, पाणीटंचाई आहे. अनेक भागांत जनावरे जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, प्रशासनासह लोकप्रतिनिधी, नेते लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने चारा टंचाई, पाणीटंचाईसारख्या प्रमुख मुद्दे दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. राज्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. शिवाय अधिक काळ नद्या, नाले, […]

अधिक वाचा..
leopard-nagar

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अथर्व प्रवीण लहामगे (वय ९) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून, या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक दिवसापासून मोकाट फिरणा-या बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त न केल्याने चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रवरा रुग्णालयासमोर […]

अधिक वाचा..
cow

निसर्गाचा चमत्कार! गायीने दिला सिंहासारख्या वासराला जन्म; पाहायला गर्दी…

भोपाळ (मध्य प्रदेश) : एका गायीने अनोख्या वासराला जन्म दिला असून, त्याला पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. या वासराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वासराबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांमध्येही उत्सुक्ता वाढली. रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज येथील गोरखा गावातील शेतकरी नथुलाल शिल्पकर यांच्या गायीने सिंहासारख्या वासराला जन्म दिला आहे. नागरिकांना हा प्रकार कळताच ते तातडीने पाहण्यासाठी […]

अधिक वाचा..

उन्हाची वाढती तीव्रता पशु पक्षांसाठी चिंताजनक

पक्षांसाठी दाणा पाण्यासह खाद्य ठेवण्याचे प्राणीमित्रांचे आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या उन्हाची तीव्रता वाढत असताना नागरिकांना देखील उष्णतेचा सामना करावा लागत असताना अनेक ठिकाणी पक्षांचे पाण्याअभावी हाल होत असल्याचे दिसत असून काही पक्षांचे बळी जात आहे. परंतु नागरिकांनी सध्या पक्षांना दाणा पाणी ठेवण्याचे आवाहन आवाहन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे […]

अधिक वाचा..
solapur cow

लक्ष्मी गायीने दिला तब्बल चार वासरांना जन्म; बघण्यासाठी गर्दी…

सोलापूर : एका गायीने तब्बल चार वासरांना जन्म दिल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पापरी गावात घडली आहे. चारही वाससे आणि गाय अगदी ठणठणीत आहे. एकाच वेळी चार वासरांचा जन्म होणे ही दुर्मिळ गोष्ट मानली जात आहे. वासरांना बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. गणेश लोंढे असे गायीच्या मालकाचे नाव आहे. लोंढे यांनी 2017 ला मुंबईतील नोकरी सोडून […]

अधिक वाचा..
snake

शिरूर तालुक्यात पुन्हा विषारी सर्पदंशाने दुभत्या गायीचा मृत्यू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या रोहिलवाडीत घोणस सर्प नदीकिनारी शेतालगत चारत असलेल्या दुभत्या जर्शी गायीस चावल्याने काही मिनीटातच त्या गायीचा सापाच्या विषबाधेने दुर्दैवी मृत्यू झाला. सर्प दंशाने मोठी गाय क्षणार्धात दगावल्याने शेतकरी किसन केरू रोहिले यांचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. कवठे येमाईच्या रोहिलवाडीतील […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर परिसरात जनावरे चोरणारे तिघे २४ तासात जेरबंद

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील परिसरात वारंवार जनावरे चोरीला जाण्याच्या घटना घडत असताना नुकत्याच चोरीला गेलेल्या गायांसह जनावरे चोरणाऱ्या तिघांना २४ तासात जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून संजय उर्फ संज्या भाऊसाहेब वाघमारे, अमीर साहेबराव घाडगे व दर्शन भीमराव धोत्रे असे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. पाबळ (ता. शिरुर) येथील बेन […]

अधिक वाचा..