कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अंबादास दानवेंनी मांडली सभागृहात आक्रमक भूमिका

मुंबई: राज्यातील कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविले गेले पाहिजे, यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत २८९ अनव्ये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. बार्शीतील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये चेक दिल्याची बाब दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून […]

अधिक वाचा..

जातेगावच्या शेतकऱ्याला शासनाकडून मिळालेला सौर पंप चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मिळालेला सौर उर्जेवर चालणारा सौर पंप चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील विजय खैरे यांना शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी सौर उर्जेवर चालणारा सौर पंप […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याचा विहीरीत पडून मृत्यू…

टाकळी हाजी (अरुणकुमार मोटे): चांडोह (ता. शिरूर) येथील शेतकरी भानुदास गणपत गाडगे हे आज (शुक्रवार) पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास शेतातील कांदयाला पाणी देण्यासाठी गेला असताना शेतातील विहीरीत पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, चांडोह (ता. शिरूर) येथे भानुदास घाडगे यांची शेतजमिन गट नं. ५८/१/अ मध्ये तीन एकर शेत जमीन […]

अधिक वाचा..
solapur cow

लक्ष्मी गायीने दिला तब्बल चार वासरांना जन्म; बघण्यासाठी गर्दी…

सोलापूर : एका गायीने तब्बल चार वासरांना जन्म दिल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पापरी गावात घडली आहे. चारही वाससे आणि गाय अगदी ठणठणीत आहे. एकाच वेळी चार वासरांचा जन्म होणे ही दुर्मिळ गोष्ट मानली जात आहे. वासरांना बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. गणेश लोंढे असे गायीच्या मालकाचे नाव आहे. लोंढे यांनी 2017 ला मुंबईतील नोकरी सोडून […]

अधिक वाचा..

मुंबईच्या सभेत महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर पंतप्रधान मोदींनी बोलावे…

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयांवरही पंतप्रधान मोदींनी बोलावे, असे […]

अधिक वाचा..

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांच्या निधन

संभाजीनगर: मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. शेतकरी कष्टकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका घेणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यांनी व्यक्त करत भाई यांना श्रद्धांजली वाहिली. या दुःखद […]

अधिक वाचा..

विदर्भात अधिवेशन सुरु असताना शेतकऱ्याला न्याय मिळेल का?

नागपूर: राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना, या भागातील संत्री पिकावर ‘कोळशी’ या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भात अधिवेशन सुरु असताना या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. संबंधित मंत्र्यांनी दिलेले […]

अधिक वाचा..

शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार…

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस खात्यांतर्गत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत नायगाव (ता. हवेली) येथील शेतकरी कुटुंबातील प्रवीण शिवाजी कांचन यांनी बाजी मारली आहे. शेतकऱ्याचा मुलगा फौजदार बनल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रवीण कांचन यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे झाले. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण कुंजीरवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयातून तर उच्च […]

अधिक वाचा..

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळींबाच्या शेतीतून काढले 20 लाखांचे उत्पन्न…

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील कृष्णा चावरे या शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ जमिनीवर डाळिंब बाग फुलवून दाखवली आहे. विशेष म्हणजे फक्त बाग फुललीच नाही तर त्यातून लाखोंचा उत्पन्न देखील मिळवले आहे. आपल्या पारंपारिक पद्धतीच्या शेतीला फाटा देऊन काही तरी नवीन प्रयोग करण्याचं कृष्णा चावरे यांनी ठरवलं होते. चावरे यांची कोळीबोडखा शिवारात […]

अधिक वाचा..
Ambadas Danwe

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची वाघाळे गावास भेट…

वाघाळेः विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (दि. २१) वाघाळे गावास भेट देऊन नुकासानीची पहाणी केली. गावातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसान भरपाई द्यावी, असे सुचित केले. यावेळी अनेक शेतकऱयांनी झालेल्या नुकसानीविषयी व्यथा मांडल्या. वाघाळे गावात तीन वेळा ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष […]

अधिक वाचा..