शेतकऱ्यांना मारहाण करून पैसे वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

राज्यातील भाकड जनावरांना घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण केली जाते, त्यांच्याकडून पैसे वसूल करणारी टोळी सक्रीय नागपूर: राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावर विकू शकत नाही. राज्यात गोरक्षक नावाखाली टोळ्या तयार झाले आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप महायुती सरकारचेच

ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार प्रकरणावरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल नागपूर: राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार […]

अधिक वाचा..

सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा

प्रश्नोत्तराच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिली थातुर मातुर उत्तर नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही,सोयाबीनला हमीभाव मिळत नाही याबाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी थातुर मातुर उत्तर दिली यावरून विरोधक संतापले. सरकारने दिलेले उत्तर म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे असा आरोप काँग्रेस […]

अधिक वाचा..

राज्याची तिजोरी जनतेचीच; शेतकरी, कष्टकरी आणि बहिणींसाठीच खर्च होणार

लाडकी बहिण योजनेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सडेतोड प्रत्युत्तर पाचोरा: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची कला मला आहे. त्यामुळेच जनतेच्या मनातले सरकार स्थापन करता आले. त्यामुळे पाचोरा येथील जनता ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहून पाचोरा नगर परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर; कान्हूर मेसाई परीसरात शेतकऱ्यांना मिळणार दिवसा विजपुरवठा

मानसिंग पाचुंदकर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश  कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्यात कान्हूर मेसाई परीसरात गेल्या काही महिन्यांपासुन बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. परंतु शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी नाईलाजाने जीव मुठीत धरतं रात्री शेतात जावे लागत होते. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले होते. परंतु कान्हूर मेसाईसह परिसरातील शेतकऱ्यांना आता दिवसा विजपुरवठा मिळणार आहे. रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना फक्त ७ दिवसांत मिळणार हक्काचा शेतरस्ता जाणून घ्या महसूल विभागाचा नवा आदेश

औरंगाबाद: शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठीचा रस्ता मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे तहसील कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. आदेश निघूनही अंमलबजावणी होत नव्हती. पण आता हा त्रास संपणार आहे. महसूल विभागाचा नवा निर्णय तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी आता फक्त ७ दिवसांत करावी लागेल. रस्ता मोकळा केल्यानंतर जिओ-टॅग फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल. प्रत्येक शेतात जाण्यासाठी किमान १२ फूट रुंदीचा […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी भारती विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटींची मदत; आमदार डॉ. विश्वजीत कदम

मुंबई: सांगली जिल्ह्यातील पालूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. ही मदत भारती विद्यापीठाच्या स्व. डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण निधी तर्फे देण्यात आली आहे.यावेळी डॉ. कदम म्हणाले, “शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम […]

अधिक वाचा..

राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसे नाही पण…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या म्हणून सत्ताधारी आमदारांना निधीच्या रुपात खैरात वाटली जात आहे, हा विरोधकांवर अन्याय आहे नागपूर: राज्यात कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे.केंद्र सरकारने लावलेल्या निकषांमुळे तसेच शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याची मंजुरी आलेली नाही,त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही. हे सरकार सत्ताधारी आमदाराना पाच कोटी रुपयांचा निधी देतात मग कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडे […]

अधिक वाचा..

३१ हजार कोटींचं पॅकेज नव्हे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची थट्टा

पूरग्रस्त शेतकऱ्यांची अवहेलना करणारे सरकार; ॲड. अमोल मातेले यांचा सरकारवर तुफान हल्ला  मुंबई: राज्यातील पूरग्रस्त भागासाठी सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये “खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रुपये” आणि “नरेगा योजनेतून हेक्टरी ३ लाख रुपये” देण्याची तरतूद सांगण्यात आली आहे. मात्र ही आकड्यांची खेळपट्टी असून, शेतकऱ्यांच्या […]

अधिक वाचा..

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, महायुती सरकारने शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले

मुंबई: अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानासोबत शेतकऱ्यांचे घर दार संसार उघड्यावर पडले आहेत परंतु भाजपा महायुती सरकारने मात्र नुकसानभरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने जाहीर केलेली मदत ही […]

अधिक वाचा..