शिरुर तालुक्यात सेवानिवृत्त सैनिकाचा जल्लोषात स्वागत करत सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): भारत देशाची सेवा करुन आपल्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या सैनिकासह त्याच्या कुटुंबीयांचा शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत करत गणेशोत्सव निमित्त गणरायाची आरती करत सेवा निवृत्त सैनिक विलास दौंडकर यांचा सन्मान केला असल्याने सैनिक देखील भारावून गेले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) गावचे भूमिपुत्र मेजर विलास वसंत दौंडकर नुकतेच सैन्यदलातुन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सेवानिवृत्त सैनिकांची मिरवणूक काढत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): भारत देशाची सेवा करुन आपल्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या 2 सैनिकांसह त्यांच्या कुटुंबीयांची शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत मिरवणूक काढून सेवा निवृत्त सैनिकांचा सन्मान केला असल्याने सैनिक देखील भारावून गेले आहे. मोराची चिंचोली (ता. शिरुर) गावचे भूमिपुत्र मेजर दत्तात्रय आण्णासाहेब मिडगुले व मेजर सोमनाथ सिताराम थोपटे हे नुकतेच सैन्यदलातुन […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथपाल संतोष काळेंचा सन्मान

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने काही वाचन प्रेमी युवकांकडून राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करत ग्रंथपाल संतोष काळे यांचे विशेष सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे भैरवनाथ मोफत वाचनालयच्या माध्यमातून वाचक ग्रंथालयाभिमुख होण्यासाठी ग्रंथपाल संतोष काळे हे सतत नवनवीन प्रयोग व संकल्पना राबवीत असल्यामुळे शिक्रापूरसह परिसरामध्ये शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रंथालयास […]

अधिक वाचा..
sanaswadi

सणसवाडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान

शिक्रापूर: ध्वजारोहण करण्यासाठी अनेकांची रस्सीखेच चालल्याचे चित्र नेहमी दिसत असताना काही ठिकाणी ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी मोठमोठी पदे खेचून आणली जात असताना सणसवाडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या ध्वजारोहणाचा मान चक्क ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची ध्वजारोहण […]

अधिक वाचा..

निमोणे आयडॉल व्हाट्स अँप गृप च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

शिंदोडी (तेजस फडके): विद्यार्थ्यांनो दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत नापास झाला तर मनात न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. जीवनात कोणतीच गोष्ट अवघड नसते. फक्त आपण मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू हा सारखाच असतो. परंतु त्याचा वापर कोण कसा करतोय यावर यश अवलंबुन असतं असे मत शिरुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर […]

अधिक वाचा..

आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पलांडे कुटुंबियांचा अनोख उपक्रम

मुखईत पलांडे कुटुंबियांतील सदस्यांकडून आई वडिलांची सन्मान करत ग्रंथतुला शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील बबन पलांडे व रत्नाबाई पलांडे या दाम्पत्याने मोठ्या कष्टाने संसार उभा करत आपल्या मुलांना शिक्षण दिले. शिक्षणानंतर पलांडे दाम्पत्यांची मुले सध्या शिक्षक, आयकर आधिकारी, IPS व IAS अधिकारी अशा उच्च पदावर काम करत आहेत. ग्रामीण भागात अद्यापही एकत्र कुटुंब पद्धत असून […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे व ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या हस्ते नुकताच गुरुपौर्णिमा निमित्त सन्मान करण्यात आला आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे व ज्युनिअर कॉलेज येथे गुरु पोर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी सरपंच अविनाश साकोरे, ग्रामशिक्षण समितीचे श्रीहरी पऱ्हाड, माऊली थिटे, भाऊसो थिटे, […]

अधिक वाचा..

केंदूरच्या पाचवड शाळेत मार्गदर्शक शिक्षक व गुणवंतांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंथन व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करत सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी कोरोना काळात देखील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण मुलांना देत मुलांची शिष्यवृत्ती पूर्व […]

अधिक वाचा..