केंदूर मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान

इतर

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे व ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या हस्ते नुकताच गुरुपौर्णिमा निमित्त सन्मान करण्यात आला आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे व ज्युनिअर कॉलेज येथे गुरु पोर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी सरपंच अविनाश साकोरे, ग्रामशिक्षण समितीचे श्रीहरी पऱ्हाड, माऊली थिटे, भाऊसो थिटे, विठ्ठल ताथवडे, शिक्षक एम. पी. पाटील, बी. एम .धस, एस. एम. ढोक, आर. बी. पानमंद, पी. आर. भुरे, आर. एस. उघडे, एस. एम. पाटील, एस. आर. पिचड, एम. पी. वागतकर, आर. डी. भिसे, एस. एम. जोहरे, सी. आर. थिटे, पी. सी. शिर्के, एन. व्हि. बहिरम, दशरथ सुक्रे, शिवाजी ताथवडे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

unique international school
unique international school

यावेळी बोलताना शिक्षकांनी शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख पुणे विभागीय सदस्य राम साकोरे केला तर विद्यर्थीनी मनोगत व्यक्त केले असून यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देत सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. डी. वागतकर व विद्यार्थी प्रतिनिधी अवंतीका थिटे यांनी केले तर आभार एम. पी. पाटील यांनी आभार मानले.