पेट्रोल डिझेल दरात वाढ जाणून घ्या आजचे दर…

मुंबई: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. पेट्रोलचे आजचे […]

अधिक वाचा..

आईला मारहाण करत आत्ताच्या आत्ता मला पैसे द्या नाहीतर…

केरळ: एक तरुण मुलगा त्याच्या घरच्यांकडे जबरदस्ती पैशांची मागणी करत आहे. पैसे मागताना हा मुलगा शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचंही दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार केरळ मध्ये घडला आहे. तरुण मुलगा व्हरांड्यावर बसलेल्या वृद्ध महिलेला शिवीगाळ आणि लाथ मारण्यापूर्वी ओरडताना आणि त्याच्या घराच्या बंदांवर खिडक्या हिंसकपणे मारताना दिसत आहे. घटनास्थळावरील अन्य एका महिलेवरही तरुण चप्पल फेकताना […]

अधिक वाचा..

नगरसेविकेला ब्लॅकमेल करत मागितली 25 लाखांची खंडणी…

पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करीत एका नगरसेविकेला माहिती अधिकार कार्यकर्त्याने 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर नगरसेवक पद घालवू, अशी धमकी देत ही खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र अशोक भोसले (रा. […]

अधिक वाचा..

मुद्द्याची लढाई गुद्यावर आली, मित्रानेच केला चाकूने सपासप वार…

परभणी: परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हत्येची ही थरारक घटना घडली. परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा खून करण्यात आला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. संपूर्ण परभणी जिल्ह्यात हत्येच्या या घटनेनं खळबळ उडाली […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जनावरांना होऊ लागला लंपी आजाराचा शिरकाव

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनावरांमधील लंपी या संसर्गजन्य आजाराची लागण होत असताना पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये काही प्रमाणात जनावरे बाधित सापडलेली असताना शिरुर तालुक्यात देखील लंपी सदृश जनावरे आढळून आलेली असल्याने शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. शिरुर तालुक्यात जनावरांची संख्या जास्त असून अनेकदा जनावरांना वेगवेगळ्या आजारांची लागण झाल्याचे समोर आलेले असताना […]

अधिक वाचा..

शिक्षकांना शिकवण्याशिवाय इतर कामे देऊ नये: चंद्रकांत वारघडे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षक मुलांना घडवण्याचे मोलाचे कार्य करत असतात शिक्षकांमुळेच विद्यार्थी घडत असतात मात्र शासनाने शिक्षकांना मुलांना शिकवण्याशिवाय अन्य कामे देऊ नये, असे प्रतिपादन माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केले आहे. बकोरी ता. हवेली येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने माहिती सेवा समितीच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना माहिती सेवा समितीचे […]

अधिक वाचा..

आश्रमशाळेत स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेचा अनोखा उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जात असताना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करुन घेतली जात आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात गेली दहा वर्षापासून संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक […]

अधिक वाचा..

वेळ नदी काठी दारु विक्री करणारा अखेर जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या काठी असेलल्या झाडांचा फायदा घेत देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी छापा टाकत देशी दारुच्या बाटल्या जप्त करत किसन शंकर शिंदे या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या कडेला एक व्यक्ती देशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत मोटारी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना या चोरट्यांचा छडा लावणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेले असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने विद्युत मोटारी चोरणाऱ्यांना जेरबंद करत आरोपींकडून 6 विद्युत मोटार व केबल जप्त करत अक्षय उर्फ बंट्या सुनील थिटे, आदेश सुनील थिटे, सुरज उर्फ मुकेश संतोष सुपेकर यांना […]

अधिक वाचा..

गुरुंकडून मिळालेले ज्ञान खरी संस्कार शिदोरी: महेश ढमढेरे

शिक्रापूर (शेरखान शेख): गुरुंकडून मिळणारी ज्ञानरुपी संस्कार शिदोरी हीच खरी यशाची गुरुकिल्ली असून मुलांनी आई वडिलांप्रमाणे शिक्षक व गुरुजनांचा आदर करावा, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश ढमढेरे यांनी केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या गुरुजन […]

अधिक वाचा..