पुणे-नगर तीन मजली महामार्गाला स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच नांव देणार 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतुक कोंडीवर तीन मजली रस्ता व्हावे हे माजी स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करुन ज्या वेळी या रस्त्यावर तीन मजली रस्ता पूर्ण होईल तेव्हा त्या रस्त्याला पाचर्णे यांचे नाव देण्यात येईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले. शिरुर येथील तर्डोबाची वाडी येथील माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्मारक लोकार्पण सोहळ्यानिमित्त चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

यावेळी शक्तिस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी भावना व्यक्त करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,माजी आमदार बाबुराव पाचर्णे हे लढवय्ये नेते होते. त्यांनी शेतीसह विविध प्रश्न सातत्याने मांडले. पुणे- नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. या रस्त्यावर तीन मजली रस्ता व्हावा हे पाचर्णे यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी माझ्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मधल्या काळात दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. सध्या या रस्त्याला ११ हजार कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे संपूर्ण डिझाईन तयार करण्यात आले आहे.

हि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच काम पूर्ण होईल. ज्या वेळी हे काम पूर्ण होईल त्या वेळी या रस्त्याला माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे नाव देण्यात येईल. यासाठी मी स्वतः व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलून नाव देण्याची चर्चा करणार आहे. या रस्त्याला नाव देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले. तसेच पाटील यांनी बोलताना सांगितले की,रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची शाखा शिरूर परिसरात सुरू करण्यात यावी अशी सूचना करत राहुल पाचर्णे यांच्या पुढील भविष्यकाळात राजकीय पुनर्वसन संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,माजी मंत्री बाळा भेगडे,माजी मंत्री शिवाजी कर्डिले,भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,दादा पाटील फराटे,विक्रांत पाटील,संदीप भोंडवे,स्वप्नील उंद्रे,संतोष मोरे,प्रवीण काळभोर, कर्नल महेश शेळके ,गणेश कुटे,गणेश भेगडे,जयेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,जो पर्यंत आपण जिवंत राहू तो पर्यंत बाबुराव पाचर्णे यांचे नाव जिवंत राहील.त्यांनी विधानसभेत अनेक प्रश्न मांडत असताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.जनतेचे वकील म्हणून त्यांनी काम केले.

मी शक्तीस्थळावर शक्ती घेण्यासाठी आलोय.पाचर्णे यांचे गुण घेऊन मी माझ्या आयुष्यात काही बदल केला.मंत्रालयात कामे पूर्ण होऊ पर्यंत ते बसून राहायचे.जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी त्यांचा कायम प्रयत्न असायचा.देव देश धर्म संस्कार या साठी काम करणारे पाचर्णे होते.त्यांचे काही गुण घेऊन मी माझ्या जीवनात बदल केला आहे असे बावनकुळे म्हणाले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते,पाचर्णे कुटुंबीय उपस्थित होते. फोटो पाचर्णे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केले.